Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धाकुरुक्षेत्रात महाराष्ट्राचा सुवर्णइतिहास!

तरुण भारतbyतरुण भारत
February 4, 2026
in sports
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


किशोरींचे सलग आठवे विजेतेपद, किशोरांना कांस्य समाधान
थीम पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या खो-खो सामर्थ्याची दणदणीत मोहोर
महाराष्ट्राची परंपरा कायम, इतिहासात नवा अध्याय!
महाराष्ट्राच्या अपर्णा वर्देला देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा इला पुरस्कार

हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे सुरू झालेल्या ३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने विजेतेपद पटकावत सलग आठव्या अजिंक्यपदाची ऐतिहासिक नोंद केली. या स्पर्धेत इला पुरस्कार महाराष्ट्रच्या अपर्णा वर्देने, तर भरत पुरस्कार ओडिसाच्या सत्या राजन बेहरने पटकावला. सलग नऊ वेळा अजिंक्यपद जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या किशोर संघाला यंदा मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

किशोरी अंतिम सामना : राजस्थानवर एकतर्फी विजय, महाराष्ट्राचा दबदबा
हरियाणातील थीम पार्क मैदानावर झालेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने राजस्थानवर एक डाव व १२ गुणांनी (२७–१५) दणदणीत विजय मिळवला. पहिल्याच आक्रमणात महाराष्ट्राने १७ गुणांची (२४–७) निर्णायक आघाडी घेतल्याने सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. महाराष्ट्राकडून राही पाटील (२.१० मि. संरक्षण व २ गुण), वेदिका तामखेडे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), अपर्णा वर्दे (२.३५ मि. संरक्षण व २ गुण), ऋतुजा सुरवसे (१.५० मि. संरक्षण), पियुशा परमाळकर (१.४५ मि. संरक्षण) यांनी भक्कम कामगिरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानकडून तुलसी (१.४० मि. संरक्षण), गुंजन (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), राधिका (४ गुण) यांनी प्रतिकार केला; मात्र महाराष्ट्राच्या वेगवान खेळापुढे तो अपुरा ठरला.

किशोर अंतिम सामना : ओडिसाची कोल्हापूरवर निर्णायक बाजी
किशोर गटाच्या अंतिम सामन्यात ओडिसाने कोल्हापूरचा एक डाव ७ गुणांनी (३१–२४) पराभव करत अजिंक्यपद पटकावले. ओडिसाकडून सत्यरंजन (२, १ मि. संरक्षण व ८ गुण), चिन्मय अम्रिता (१.१०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), अमरज्योती (१.१०, १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी उत्कृष्ट अष्टपैलू खेळ साकारला. कोल्हापूरकडून देवराज येड्राव (६ गुण), गौरव माने (८ गुण) यांनी झुंज दिली; मात्र विजय ओडिसाच्याच पारड्यात गेला.

किशोर उपांत्य फेरी : ओडिसाकडून महाराष्ट्राचा अडथळा
याआधी झालेल्या किशोर गटाच्या उपांत्य फेरीत ओडिसाने महाराष्ट्रावर ५ गुणांनी (३०–२५) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे ५ गुणांची आघाडी होती; मात्र दुसऱ्या डावात ओडिसाच्या आक्रमक खेळामुळे सामना त्यांच्या बाजूने झुकला. ओडिसाकडून सत्या (१.१०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण), चिन्मय (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी निर्णायक खेळी केली. महाराष्ट्राकडून वरद पोळ (२.४०, २ मि. संरक्षण व २ गुण), कर्तव्य गादेकर (१.५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी लढत दिली. या पराभवानंतर महाराष्ट्राला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

वैयक्तिक पारितोषिके : गुणवत्तेचा सन्मान
किशोरी गट :

  • उत्कृष्ट संरक्षक : राही पाटील (महाराष्ट्र)
  • उत्कृष्ट आक्रमक : गुंजन (राजस्थान)
  • इला पुरस्कार व अष्टपैलू खेळाडू : अपर्णा वर्दे (महाराष्ट्र)

किशोर गट :

  • उत्कृष्ट संरक्षक : वरद पोळ (महाराष्ट्र)
  • उत्कृष्ट आक्रमक : गौरव माने (कोल्हापूर)
  • भरत पुरस्कार व अष्टपैलू खेळाडू : सत्या राजन बेहर (ओडिसा)

महाराष्ट्राचे वर्चस्व कायम
सलग आठवे किशोरी विजेतेपद, वैयक्तिक पुरस्कारांची लयलूट आणि किशोर गटातील सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे महाराष्ट्राचा राष्ट्रीय खो-खोमधील दबदबा पुन्हा अधोरेखित झाला. कुरुक्षेत्रच्या मैदानावर उभा राहिलेला हा विजयाचा झेंडा पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Post Views: 127
Previous Post

जेवळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

Next Post

राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलनात इयत्ता दहावी व बारावी वर्गाचा निरोप समारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलनात इयत्ता दहावी व बारावी वर्गाचा निरोप समारंभ

ताज्या बातम्या

20 हजार लाडू अन रक्तदान शिबीरासह साजरा झाला प्रकट दिन#public #marathinews #solapurnews #viral #viral

February 8, 2026

मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे.#public

February 8, 2026

२० हजारबलाडू वाटप अन रक्तदान शिबिरासह साजरा झाला प्रकट दिन..#public #marathinews #solapurnews #viral

February 8, 2026

आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली खा. मोहिते पाटलांचा आरोप.#marathinews #public #viral #aajsolapur

February 8, 2026

प्रिसिजन संगीत महोत्सव सतार स्वराची सजली मैफिल.#public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 8, 2026

बसवण्णाच्या चबुतरासह पुतळ्याचेही दुरुस्ती काम सुरू#public #marathinews #solapurnews #mh13 #viral

February 8, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

February 8, 2026

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0665573

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697