सांगोला – तालुक्यात ७ जि.प.गटासाठी व १४ पं.स.गणासाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून बुधवार दि.४ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे टपाली मतदान घेण्यात आले असून तालुक्यातील ९७ टक्के टपाली मतदान पूर्ण झाल्याची माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली. टपाली मतदान करण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी यांनी केले होते.
टपाली मतदान केंद्रावर नोडल अधिकारी दिपाली जाधव, सहा.गटविकास अधिकारी वसंत फुले, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्राध्यक्ष, सहा.मतदान अधिकारी, मतदान अधिकारी, मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक उपस्थित असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.



















