पारध – भोकरदन तालुक्यातील शेलुद येथे रविवार दि.८रोजी येथील श्री वैष्णव परिवार सेवाभावी संस्था,नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र आणि शेलुद येथील ग्रामस्थांच्या वतीने संत गजानन महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमा दरम्यान रविवारी सकाळी पाच वाजता श्रींचा अभिषेक,सकाळी सात ते नऊ पारायण सांगता आणि दुपारी एक ते तीन ह. भ. प.महंत संजीवदास महाराज,भैरवनाथ महाराज संस्थान,सावखेड यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन होणार आहे. त्यानंतर शेलुद येथील ग्रामस्थांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता होईल.
सदर कार्यक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन श्री वैष्णव परिवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर तथा समस्त शेलुदवासियांच्या वतीने करण्यात आले आहे.


















