पारध – भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथील विविध विकास कामांच्या मागणी साठी पारध येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ्यांनी बुधवारी दि.४ रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे.
पारध गावठाणातील विजेच्या समस्या सोडावीत याव्या गावातील जीर्ण व मोडकळीस आलेले २५एल .टी.पोल तात्काळ मिळावे, ब्रेकडाऊन,आर्थिंग,किटकॅट,बुशिंग,रॉड, लग्स, केबल, तसेच मेंटेनन्स चे काम करण्यात यावी,३३ के . व्हि.सबस्टेशन ची क्रॉसिंग काढण्यात यावी, ए .बी.स्विच बसवण्यात यावे,पराशर नगर येथिल ६३ क्षमतेचा ट्रान्सफार्मर १०० चा करून मिळवा, चौरिवाडी (रामनगर) येथे २५ च्या ऐवजी १०० चा ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात यावा
,पारध बू – पारध खुर्द रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, पारध – धामणगाव रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, रस्त्याच्या दुतर्फा नालीचे काम सुरू करून सार्वजनिक बांधकाम विभागाची तसेच ग्रामपंचायत ची हद्द कायम करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्यांसाठी बुधवार दि ४ रोजी पारध बु. येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर सरपंच शारदा काकफळे, उपसरपंच शेखर श्रीवासत्व, ग्रामपंचायत सदस्य गणेश लोखंडे, समीखा पठाण, विलास जाधव, बाबुराव काकफळे, संदीप श्रीरसागर, अमोल पाखरे, दिनेश सुरडकर आदीसह ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत.



















