अंबड – गुरुवार, दिनांक ०५/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र शासन औद्योगीक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मराठवाडा विभाग, छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (N.D.R.F.) व कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना यांचे संयुक्त विद्यमाने औद्योगीक रासायनिक आपत्तीवरील जिल्हास्तरीय प्रात्यक्षीक (मॉक ड्रील) घेण्यात आले. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (N.D.R.F.) बटालियन, पुणे यांनी औद्योगीक आपत्तीचे वेळी करावयाच्या विविध उपाययोजनांची उपस्थितांना माहिती दिली व त्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
कारखाना कॉम्पसमध्ये बगॅस, मोलासेस, अल्कोहोल व इथेनॉल यासारख्या ज्वलनशिल पदार्थाचा साठा असतो. त्याचे संरक्षण करणे व कोणताही अनुचीत प्रकार अथवा अपघात होणार नाही यासाठी घ्यावयाची दक्षता आणि अपघात प्रसंगी करावयाच्या उपायोजना याची सविस्तर माहिती सादर करण्यात आली. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याचे वतीने मॉक ड्रीलसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात आली व साखर कारखान्याची सविस्तर माहिती शासनाच्या विविध विभागाच्या उपस्थितीत प्रतिनिधींना देण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक मा.श्री.राजेश टोपे साहेब, माजी आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, NDRF बटालियन पुणेचे डॉ.राजेशकुमार गुप्ता, कमांडंट, श्री.प्रविण धत, सहा.कमांडंट, श्री.अंकीत कुमार, टीम कमांडर, श्री.राजु प्रसाद, टीम इन्चार्ज, औद्योगीक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, छत्रपती संभाजीनगरचे श्री.पी.व्ही. सुरसे, सहसंचालक, श्री.एन.ए.देशमुख, उपसंचालक, श्रीमती.एस.आर.गायकवाड, सहाय्यक संचालक, श्री.ए.जे. तळवडकर, सहाय्यक संचालक, उपविभागीय अधिकारी श्री.उमाकांत पारधी, तहसिलदार अंबड श्री.विजय चव्हाण, नगरपरिषद अंबडचे मुख्याधिकारी श्री.उकीर्डे, महावितरण जालनाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी श्री.नखाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जालना श्री.दिपक काजळकर, तालुका आरोग्य अधिकारी अंबड डॉ.दयानंद कांबळे , अग्निशमन अधिकारी, जालना श्री.संदीप दराडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहागड डॉ.वैशाली नरवडे व इतर शासकीय विभागाचे अधिकारी, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री.बी.टी.पावसे, कार्यकारी संचालक श्री.संदीप पाटील, खाते/विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
सदरील मॉक ड्रील यशस्वीतेसाठी औद्योगीक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सुचनेप्रमाणे कारखान्याचे एच.आर. मॅनेजर श्री.नितीन भवर यांनी प्रयत्न केले.


















