Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमटे दांपत्य मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन पुरस्काराने सन्मानीत

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ  मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त संस्थेच्यावतीने शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी  रोजी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. हा पुरस्कार थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना संयुक्तपणे लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  यावेळी व्यासपीठावर  संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, उपाध्यक्ष  नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी  पी टी पाटील, सहसचिव  ए पी देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. कृष्णा मस्तुद आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले, देशाचा विकास हा तरुणांवर अवलंबून आहे. भाषण व मार्गदर्शनाऐवजी कार्य करीत आहोत.  सातत्याने कर्म करीत रहावे यात समाधान मानले. आदिवासी व कुष्ठरोग्यांची सेवा केली. बाबा आमटे यांच्याकडून ही समाजसेवेची प्रेरणा घेतली. बाबा आमटे यांचे कार्य महान होते. त्यांनी श्रमाचे संस्कार केले. माणुसकीतून सेवा केली. म्हणूनच आदिवासींची भीती व कुतूहल यांच्याशी मिळते जुळते घेऊन कार्य करु शकलो. या कार्यात डॉ. मंदाकिनी आमटे यांनी बरोबरीने साथ दिली. भौतिक संसाराबरोबर सामाजिक  व आरोग्य सेवा केली. अंधारमय जीवनात प्रकाश देण्याचे कार्य केले. अज्ञान व अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या समाजात शिक्षणाद्वारे क्रांती केली. आदिवासी, अनाथ व वंचित यांना मुख्य प्रवाहात आणले. सध्या आमटे परिवाराची चौथी पिढी आदिवासींच्या सेवेत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले. तसेच पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी देखील पुरस्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  त्या म्हणाल्या, आपणही काहीतरी वेगळे कार्य करावे असा सुरुवातीलाच संकल्प केला. दोघांनीही बरोबरीने काम केले. रस्ते, पाणी, वीज, अन्न, आरोग्य सेवा आदींचा अभाव असलेल्या क्षेत्रात काम केल्याचे समाधान आहे. आजही एकत्रितपणे सर्वजण दैनंदिन कार्य करत आहोत. आदिवासींचे गुण व आपले दोष ओळखले. आदिवासींची  संस्कृती  व परंपरा खूप चांगली आहे.  शिक्षण व आरोग्य याद्वारे आदिवासींचे आयुष्य समृद्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, श्रम मूल्य जपण्याचा संदेश मामांनी दिला. बाबा आमटे यांनी आदिवासीना माणसात आणले. बाबा व मामा यांच्या कार्यशैलीत एकवाक्यता आहे. बाबा व मामा यांचे जीवन आव्हानांचे होते. पण ते घाबरले नाहीत. मामांनी ज्ञान व आरोग्य मंदीर उभा केले. वेदना हीच जीवनाची साधना आहे, असे बाबा म्हणत. शिक्षणातून माणूस निर्माण झाला पाहिजे. मूल्यधिष्टीत, चारित्र्यवान व श्रम संस्काराचा माणूस शिक्षणातून घडविला पाहिजे. मामांनी समाजाची वेदना व व्यथा मांडली. मामांच्या विचाराचा धागा निरंतर जोपासा, असे त्यांनी आवाहन केले. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव यांनी मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी कर्मवीर मामांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. संस्थेच्या लोकसहभागातून केलेल्या कार्याची माहिती विशद केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी स्वागतपर संबोधन केले. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य  डॉ. कृष्णा मस्तुद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.   कार्यक्रमाच्या सत्कारमूर्तीचा परिचय संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी अध्यक्षांचा परिचय डॉ. सुग्रीव गोरे यांनी करुन दिला. पी टी पाटील यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. यावेळी संस्थेच्या “कर्मवीर तपस्या” या पाक्षिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत विभागाने “वसा घेऊया कर्मवीरांचा” हे स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन डॉ. पी ए. पाटील व प्रा. माधुरी शिंदे  यांनी तर आभार  प्राचार्य डॉ. व्ही. पी. शिखरे यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शाखाप्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, हितचिंतक, कर्मवीर प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post Views: 113
Previous Post

सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलच्या गुणवंतांना १ लाख ६२ हजार ७०० रुपयांची रोख पारितोषिके प्रदान 

Next Post

खो-खो आणि कबड्डीचा ‘भाग्यविधाता’ हरपला!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

खो-खो आणि कबड्डीचा 'भाग्यविधाता' हरपला!

ताज्या बातम्या

रेल्वेत ९ लाखांचे दागिने लंपास करणारा तो सीसीटीव्ही फुटेजमुळे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

July 1, 2026

महापौरांनी केले स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन

July 1, 2026

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित प्रा प्रवीण दवणे यांची मुलाखत #solapurnews

July 1, 2026

नाटकाचे चालते बोलते विद्यापीठ विजयाबाई मेहता यांची एक्झिट #viral #marathinews #aajsolapur

July 1, 2026

अहिरांच्या एंट्रीबद्दल गोऱ्हे म्हणाल्या

July 1, 2026

आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरव

June 30, 2026
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

June 30, 2026

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0951683

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697