इस्लापूर – त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचा 7 फेब्रुवारी हा जन्मदिवस त्यानिमित्ताने इस्लापूर आंबेडकर नगर येथील लुम्बिनी बौद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
सर्व प्रथम आंबेडकर नगर येथील जेष्ठ नागरी जमदाडे साहेब यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले व पंचशील त्रिशरण घेण्यात आले त्या नंतर लेझीम पथकाने रमाईच्या गीतावर लेझीम नृत्य सादरकरून अभिवादन केले या लेझीम पथकात शुभांगी वाघमारे.प्रमिता हनवते, कोमल लोखंडे, निकिता हनवते शिल्पा शेळके अंकिता शेळके रोशनी शेळके वंदना शेळके पूनम शेळके सीमा शेळके सोनी शेळके मोनिका शेळके कोमल हाटेकर सारिका शेळके पौर्णिमा शेळके इतर महिलांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला संदीप शेळके नारायण शिनगारे जगदिप हनवते कोंडीबा हट्टेकर शिदोधन पवार विकास लोखाडे सिद्धार्थ घुगे संघपाल शेळके राजपाल शेळके सूरज शेळके रुपेश चव्हाण बापूराव पवार नागेश पाटील यांच्या सह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन गौरव कदम यांनी केले व आभार प्रदर्शन हिरामण शेळके यांनी मानले



















