Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !

तरुण भारतbyतरुण भारत
February 8, 2026
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज शनिवारी सोलापूर शहरात भव्य आणि दिमाखदार अशी मिरवणूक काढण्यात आली. विविध देखाव्यांद्वारे माता रमाई आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडविले. सुमारे 35 मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

          माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली. विविध संस्था – संघटनांच्या वतीने  अभिवादन करण्यात आले. दरम्यान, या जयंतीनिमित्ताने दिमाखदार अशी मिरवणूक काढण्यात आली. विविध संस्था व मंडळांच्या वतीने आकर्षक व प्रबोधनात्मक सजावट करून तथागत गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. 

        पार्क स्टेडियम जवळील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मनोभावे अभिवादन करून या मिरवणुकीस जल्लोषात व उत्साही वातावरणात आज दुपारी 4 .30 वाजता प्रारंभ झाला. गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. प्रत्येक मंडळाने माता रमाई यांच्या त्याग, संघर्ष आणि योगदानावर आधारित देखावे साकारले होते. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग प्रभावीपणे उभे करण्यात आले. या मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनसागर लोटला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

          या मिरवणुकीत वैयक्तिक साम्राज्य, एस. जी. मित्र परिवार, ज्ञानसागर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रमाई युथ फाउंडेशन, भीम दर्शन सामाजिक संस्था, मैत्री साम्राज्य सामाजिक संस्था, भीमाई प्रतिष्ठान, बी. के. ग्रुप, विश्वरत्न प्रतिष्ठान, त्यागमूर्ती माता रमाई युवा मंच, भारतीय भीम दल तरुण मंडळ आदी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

 रमा हेच आपलं पंढरपूर यासह विविध आकर्षक देखाव्याद्वारे प्रबोधन 

या मिरवणुकीत  देखाव्यांद्वारे प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडविण्यात आले. यामध्ये 

प्रबुद्ध ग्रुप : “रमा हेच आपलं पंढरपूर..!”, सम्राट युथ फाऊंडेशन : “सामाजिक परिवर्तन प्रतीक स्थळ – लखनऊ”, मैत्री ग्रुप : सजवलेल्या बग्गीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिकृती, माता रमाई प्रतिष्ठान : “इतिहास घडवणाऱ्या महामानवाच्या विचारांची ज्योत”, त्यागमूर्ती प्रतिष्ठान : “रमाई शिकली बाराखडी”

के. के. कंपनी : “डॉ. बाबासाहेब नावाच्या आकाशगंगेमधील पांढरा शुभ्र चंद्र म्हणजे रमाई” हे प्रबोधनात्मक देखावे लक्षवेधक होते. विविध 35 मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.

विविध संस्थांतर्फे मसाला भात वाटप

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल प्रतिष्ठान आणि गुरू महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने सम्राट चौक येथे मिरवणुकीत सहभागी भीम अनुयायांना मसाला भाताचे वाटप करण्यात आले.

असा होता मिरवणूक मार्ग

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,  सम्राट चौक मार्गे न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे या मिरवणुकीचा रात्री 10 वाजता समारोप करण्यात आला. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.

Post Views: 85
Previous Post

प्रिसिजन संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी सुरांनी मन जिंकले, स्वरांनी आत्मा

Next Post

मंगळवेढ्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीत दुपारी ३ पर्यंत ४७.६७% मतदान; ढोबळे, आवताडे व भालके यांच्या प्रतिष्ठेचा सामना

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मंगळवेढ्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीत दुपारी ३ पर्यंत ४७.६७% मतदान; ढोबळे, आवताडे व भालके यांच्या प्रतिष्ठेचा सामना

ताज्या बातम्या

घोड आणि शिंगरू म्हणत दिले टोमणे #marathinews #maharashtranews

June 30, 2026

राणेंचा ठाकरेंना टोला #marathinews #maharashtranews

June 30, 2026

खासदार निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट #marathinews #maharashtranews

June 30, 2026
अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

June 30, 2026
राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

June 30, 2026
डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

June 30, 2026
लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

June 30, 2026

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय; नराधमाला फाशीची शिक्षा

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0949934

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697