Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईच्या महापौरपदी मराठीच असणार! भाजपाच्या रितू तावडेची निवड निश्चित

तरुण भारतbyतरुण भारत
February 8, 2026
in mumbai
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेत मराठी महापौर करण्याचा भाजपाने दिलेला शब्द पाळला आहे. त्यासाठी जेष्ठ नगरसेविका रितू तावडे यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल केला. तर उपमहापौर पदावर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजय घाडी यांनी अर्ज दाखल केला.

दरम्यान, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केल्याने तावडे यांची निवड निश्चित मानली जात आहे. 11 फेब्रुवारीला त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मराठीच्या मुद्दावर रंगलेल्या निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक 118 जागा जिंकल्या.  प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपाने मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असणार असल्याचे जाहीर केले होते.निकालात भाजपाने 79 तर शिवसेना शिंदे गटाने 29 जागा पटकावित बहुमत मिळविले. त्यामुळे 44 वर्षानंतर भाजपाचा मुंबईत पहिल्यांदा महापौर बसणार आहे.  महायुतीच्या शनिवारी झालेल्या संयुक्त बैठकीत भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी   महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली, तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनीउपमहापौरपदासाठी  सव्वा वर्षासाठी संजय घाडी यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

कोण आहेत रितू तावडे? : 

रितू तावडे घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून  दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.  गुजरातीबहुल मतदारसंघातील मराठी चेहरा म्हणून ओळखल्या तावडे यांनी यापूर्वी शिक्षण समितीच्या अध्यक्षपद सांभाळले आहे. संघटनात्मक कामामुळे त्यांची  पक्षातील मजबूत पकड आहे.त्यांना प्रथम नागरिक म्हणून संधी देताना  भाजपाने मराठी अस्मिता आणि गुजराती मतदार या दोन्ही समीकरणांचा विचार केल्याची चर्चा आहे.

 मराठी महापौर देत विरोधकांच्या अस्मितेच्या राजकारणाला उत्तर देण्यासोबतच गुजराती मतदारांनाही प्रतिनिधित्व मिळाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  

——–

 घाडी सव्वा वर्षासाठी  उपमहापौर

महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौर देण्याचा निर्णय झाल्यानंतर  त्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याने नाराजी नाट्य पहावयास मिळाले. अखेर अडीच वर्षात दोघांना संधी द्यायचे ठरले असून पहिल्या सव्वा वर्षासाठी संजय घाडी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे अन्य इच्छुकामध्ये नाराजी असल्याचे चर्चा व्यक्त होत होती.

————-

ठाकरे गटाचा उमेदवार नाही

भाजपाने दिल्याने त्याच्याविरोधात आपला उमेदवार न देण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत गटनेत्या

किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’ संख्याबळाचे गणित आम्हाला माहित आहे. मात्र आम्ही विरोधाला विरोध म्हणून निवडीला बट्टा लावणार नाही. मात्र नव्या सभागृहात प्रबळ विरोधकांची भूमिका बजावू.’ 

———-

 असे आहे पक्षीय बलाबल : 

भाजपा 89, शिवसेना (ठाकरे गट) 65, शिवसेना (शिंदे गट) 29, काँग्रेस 24, एमआयएम 8, मनसे 6, राष्ट्रवादी (अजित पवार) 3, समाजवादी पक्ष 2 आणि राष्ट्रवादी (शरद पवार) 1.

 रितू तावडे या यापूर्वीही भाजपतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी आहेत.

: मुंबईच्या संभाव्य महापौर रितू तावडेंची संपत्ती आणि शिक्षण किती?

 मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपतर्फे रितू तावडे यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना आणि भाजपचे मुंबई महापालिकेतील संख्याबळ पाहाता महापौर हा भाजपचा आणि उपमहापौर हा शिवसेनेचा होईल अशी शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव झाले होते.  

कोण आहेत रितू तावडे ?

रितू तावडे या यापूर्वीही भाजपतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक असून दुसऱ्यांदा त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत.  2012 साली रितू तावडे या प्रभाग क्र.121 मधून निवडून आल्या होत्या तर 2025 साली त्या प्रभाग क्र.132 मधून निवडून आल्या.

Post Views: 46
Previous Post

माढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद  व १४ पंचायत समितीसाठी टक्के मतदान

Next Post

‘एकता महिला मंच’च्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

'एकता महिला मंच'च्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

घोड आणि शिंगरू म्हणत दिले टोमणे #marathinews #maharashtranews

June 30, 2026

राणेंचा ठाकरेंना टोला #marathinews #maharashtranews

June 30, 2026

खासदार निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट #marathinews #maharashtranews

June 30, 2026
अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

June 30, 2026
राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

June 30, 2026
डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

June 30, 2026
लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

June 30, 2026

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय; नराधमाला फाशीची शिक्षा

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0949658

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697