सोलापू – व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रास्ताविक 9 वी च्या विद्यार्थ्यांनी केले . व कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच यांच्या हस्ते सरस्वती पूजन संपन्न झाला. यावेळी 10 वी च्या शिक्षक भगतलाल सुतार व भाग्यश्री गिडवीर यांनी क्लास मॉनिटर ला भेट वस्तू म्हणून दिली. तसेच विद्यार्थ्यांकडून भगतलाल सुतार सर यांना डिजिटल फोटो फ्रेम गिफ्ट देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून अनेक प्रकारचे डान्स, फन्नी गेम, घेण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जी एच, उपमुख्याध्यापिका मिना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनिता मंद्रुपकर व नागमणी पेगडा व सुप्रिया बोम्मा क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील व भगतलाल सुतार व इंद्रजीत चव्हाण व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापूरे, उपाध्यक्ष यमुना दिड्डी, सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे यांनी आभार मानले.


















