सोलापूर – आचारसंहिता कालावधीत शहर – जिल्हा परिसरातील संयुक्त कारवाईत अवैध बनावट देशी, विदेशी मद्य व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य हातभट्टी दारु निर्मिती, विक्री वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत रूपये ०१ कोटी ११ लाख ५६२ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १६ जानेवारी ते ०६ फेब्रुवारी २०२६ या आचार्संहिता कालावधीमध्ये एकुण १९५ गुन्हे नोंद करण्यात आले असुन १८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, सदरच्या कारवाईत ६८,११० लि. रसायन, ३९५० ली. हातभट्टी दारु, ८३७ ब. लि. देशी मद्य, ४०९ ब.लि. विदेशी मद्य, १९८७ ब.ली. परराज्यातील विदेशी मद्य, १९,८०० बनावट बुचे, ८६ ब.लि. बिअर, १०१९ ली. ताडी, १०८ब.ली. वाईन, २४० किलो गुळ पावडर, तसेच ०६ चारचाकी वाहन व १४ दुचाकी वाहनांसहं एकुण रूपये ०१ कोटी ११ लाख ५६२ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २९ जानेवारी ते ०६ फेब्रुवारी २०२६ या कालवधीमध्ये निरीक्षक भरारी पथक क्र.२ या कार्यालयाने माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे कारवाई करुन ५४० ब.लि (६० बॉक्सेस) गोवा परराज्यातील विदेशी मद्याची वाहतुक करणाऱ्या एक चारचाकी वाहनासह एकुण रुपये १६,७०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एक आरोपी अमोल वसंत खटके रा. तांबवे ता. माढा यास अटक करण्यात आली आहे.
निरीक्षक कुडुवाडी विभाग सोलापूर या कार्यालयाने बार्शी तालुक्यातील मौजे शेळगाव येथे अवैध गोवा परराज्यातील २२५ ब.ली. (१६ बॉक्सेस) विदेशी मद्य तसेच २००० बनावट बुचे ईत्यादीची वाहतुक करणाऱ्या एक चारचाकी वाहनासह एकुण रुपये ५,७४,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एक आरोपीस अटक करण्यात आली आहे. या विभागाकडुन अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण ६ ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण १८ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई आर.एम. चवरे, व्ही घाटगे, राकेश पवार पंकज कुंभार, सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक गणेश कुदळे, सुमित भोसले पी.जी. कदम, नेवसे बहुधाने, अमित नागरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, आनंद जोशी, एस, ए. बिराजदार जवान चेतन व्हनंगुटी, प्रशांत इंगोले, योगीराज तोग्गी, रेवणसिद्ध कांबळे, टेळे, आबा कसबे, दिनकर शिंदे, आर एस. लोखंडे, अशोक माळी, प्रसन्ना साळुंके, योगेश पाटील पुसावळे, चौधरी, बाबासाहेब जाधव. कपिल स्वामी, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, महिला जवान क्ल्पना जाधव, शिवानी मुढे, वाहनचालक, संजय नवले, रशीद शेख, मारुती जडगे वदिपक वाघमारे यांनी पार पाडली.


















