सोलापूर : सोशल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सने आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये अॅक्ट ग्रुप सोलापूरचे प्रसिद्ध नाटक “आराम बाग” सादर करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलिस उपायुक्त गौहर हसन आणि अध्यक्षस्थानी सोलापूर सोशल असोसिएशनचे अध्यक्ष अखलाक वाडवान उपस्थित होते.
यावेळी गौहर हसन म्हणाले की, मी आजपर्यंत अनेक नाटके पाहिली आहेत पण मी इतके दर्जेदार आणि अप्रतिम नाटक पाहिलेले नाही. या नाटकाने मलाच नाही तर सर्व प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध केले आहे. अखलाक वाडवान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की ,आराम बागसारखी नाटके आपल्या राष्ट्राचे भविष्य घडवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे एक उत्कृष्ट नाटक होते जे आपल्या मनात जपले आहे.
हे नाटक सय्यद इक्बाल यांनी दिग्दर्शित केले असून याचे लेखक आफताब हसनैन आहे. या नाटकात अभिनेता अशफाक सातखेड (आफताब हसनैन), हयुम कुरेशी (जहेन), वसीम शाहबाद (जिहादी), नदीम शेख (लिंबुवाला), सुफयान शाहपुरे (बेदीन) तर रियाज अंबिलखिचडे (दिनदार) ह्या भूमिका साकारल्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांची प्रशंसा झाली आहे. या नाटकाचे संगीत सय्यद मुहाफिज तर प्रकाशयोजना सय्यद सफदर अली यांनी केली आहे. लचकरच अॅक्ट ग्रुप प्रेक्षकांसमोर दोन नवीन नाटके सादर करणार आहे.



















