भोकरदन : येथील जि.प. के. प्रा.शाळा कन्या येथे दि.०६ शुक्रवार रोजी बाल धमाल या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विदयार्थी यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी बाल धमाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
बी. एल. बडगे शि. वि. अ. प. स. हे होते तर उदघाटक म्हणून नगरसेवक मुकेश चिने, होते, प्रमुख अतिथी म्हणून एस. बी. नेव्हार, संतोष इंगळे, नगरसेवक कदिर बापू, रणविर सिंह देशमुख, रमेश बिरसोने, दिपक मोरे, रामदास पाथरे मामा, सुमित थारेवाल, रिलस्टार कु. जान्हवी गिरी, केंद्रप्रमुख आर. एच. सोनवणे, डी. पी. वाघ, अजय व्यवहारे , भोकरदन पोलीस ठाण्याचे येथील पीएसआय भाऊसाहेब सहाने , किशोर मोरे पोलिस पत्रकार इरफान सर, सुरेश गिराम ., व्ही एन. वायाळ, कृष्णा वाघ, सिंधुताई लव्हाळे, यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बालकांनी विविध कला प्रकार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली, देशभक्ती, भारूड, गोंधळ, मिक्स गाणी यांनी प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमास विशेष निमंत्रीत रील स्टार जान्हवी गिरीने लावणी नृत्य सादर केले. महिला वर्गाची उपस्थिती खूप होती.
बाल कलाकारांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्छ झाले, अंगणवाडी बालकांनी ही सादरीकरण केली, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय शास्त्री यांनी केले कार्यक्रम यशस्वीत साठी शालेयव्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर माणिकराव इंगळे, उपाध्यक्ष अनिल आक्से, समाधान कराळे, मुख्य ध्यापक शेषराव गवळी, शिक्षक श्रीमती सी आर इंगळे, ए. ई. आव्हाड, डी.एन. दौड, वैशाली शर्मा, शिक्षक एस एस. बोर्डे, गणेश शर्मा, गणेश बरडे, रामू शर्मा, एस पी भावसार, दिपक जाधव, भगवान देठे, मंगेश पगारे यांनी परीश्रम घेतले























