सोलापूर- सोरेगाव येथील परमपूज्य संत श्री गजानन महाराज यांच्या पावन प्रकट दिनाचे औचित्य साधून भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल घ्या माध्यमातून स संस्थेचे सचिव सागर पुकाळे यांचा सौजन्यातून सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या महाराजांच्या शिकवणीप्रमाणे गरजू, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य बांधवांना आरोग्यदायी फळांचे वाटप करून त्यांच्यासोबत आनंदाचा हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमातून केवळ फळांचे वाटप नव्हे तर प्रेम आपुलकी आणि माणुसकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे असे आपल्या मनोगतात म्हणाले.
गजानन महाराजांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती व समाधान नांदो हीच प्रार्थना. || गण गण गणात बोते || यावेळी अध्यक्ष सुशील महिंद्रकर, प्रभाकर कुसुमकर, आरती खमीतकर, किरण रणसुबे, दिपा उपरे, ज्योती झिंगाडे, ज्योती क्षीरसागर, द्वारकाधीश क्षीरसागर, अश्विन डोईजोडे, राजेश झिंगाडे, विलास कंकाळ, रवि वायचळ प्रकाश जवळकर, गणेश क्षीरसागर, इत्यादी जण यावेळी उपस्थित होते.


















