सोलापूर – ग्रामीण घटकातील रिक्त 90 पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये दी. 11 फेब्रुवारी रोजी पासून पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात शाररिक चाचणी सुरू होत आहे.
सदर भरतीसाठी सोलापूर ग्रामीण घटाकाकडे एकूण 4113 उमेदवारांच अर्ज प्राप्त असून दिनांक 11/02/2026 रोजी 500 उमेदवारांची शाररिक चाचणी प्रक्रिया पार पडत आहे. त्यानंतर पुढे टप्या-टप्याने शाररिक चाचणी पार पडणार आहे. या चाचणीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आलेली असून त्यामध्ये प्रथम उमेदवारांची नोंदणी, कागदपत्र तपासणी, बायोमेट्रीक तपासणी झााल्यानंतर त्यांची शाररीक चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शी असून सर्व भरती प्रक्रिया ही सीसीटीव्ही च्या निगरणाी खाली पार पडणार आहे. तसेच व्हीडीओग्राफी देखील करण्यात आलेली आहे.
या भरतीमध्ये आरएफआयडी चा देखील वापर करण्यात येणार आहे. यामुळे 100 मीटर, 800 मीटर यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी नियम व अटी यांचे डिजीटल बोर्ड लावण्यात आलेले आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी कोणत्याही उमेदवारांनी कोणाच्या भूल थापा, आश्वासन यांना बळी पडू नये अशा प्रकारे कोणी उमेदवारांना फसविण्याचा प्रकार करत असल्यास त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क करावे.
बाहेरगावहून येणारे उमेदवारांच्या मुक्कामाची सोय देखील पोलीस मुख्यालयजवळ करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी देखील सदर भरती प्रकियेस पारदर्शीपणे सामोरे जावे, त्यामध्ये कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा वापर करू नये आवाहन केले आहे.
























