सोलापूर – उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील श्री स्वामीनारायण आश्रम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग आणि समग्र आरोग्य परिषद हे परिषद राष्ट्रीय समग्र आरोग्य संस्था (NIH) आणि श्रीस्वामीनारायण आश्रम, ऋषिकेश यांनी आयोजित केली होती.
यात सोलापूरचे योग निसर्गोपचार व संमोहन तज्ञ डॉ. क्रांतीवीर शिवराम महिंद्रकर व सौ चंदा क्रांतीवीर महिंद्रकर यांनी सहभाग नोंदविला. उपाध्यक्ष GLG योग स्कूल व्हिएतनाम संस्थापक SKM योग, व्हिएतनाम डॉ .विनोद कश्यप चेअरमन राष्ट्रीय समग्र आरोग्य संस्था या अधिवेशनात डॉ. क्रांतीवीर महिंद्रकर यांना यांच्या हास्ते गोल्ड मेडल व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी जीएलजी योगा स्कूल, व्हिएतनाम आणि एसकेएम योगा यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आले होते. या अधिवेशनात नेदरलँड , बाली, रशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, नेपाळ, साउथ आफ्रिका, थायलंड ,चीन, श्रीलंका येथील प्रतिनिधी आले होते .
























