सोलापूर- तळे हिप्परगा येथील नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवसमर्थ मोटार ड्रायविंग स्कूलतर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, असिस्टंट आरटीओ इन्स्पेक्टर स्वप्नील गिरी, आय.एम.व्ही. आरटीओ इन्स्पेक्टर प्रतीक्षा नारायणकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा अभियानाबाबत सखोल माहिती दिली.
या अभियानात महाविद्यालयीन तरुणांना दुचाकी, चारचाकी चालवण्या संबंधाचे सर्व नियम, अपघात होण्याचे कारण, अपघात होऊ नये यासाठी पाळण्याचे वाहतूक नियम, हेल्मेटचे महत्व तथा अन्य सर्व महत्वाच्या बाबी प्रतीक्षा नारायणकर यांनी विद्यार्थ्यांना याबाबत जनजागृती केली.
औद्योगिक संस्थेतील मुलांतर्फे पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालय, शिवसमर्थ ड्रायविंग स्कूलचे संचालक संतोष नामदास, सन्मित्र मोटार ड्रायविंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पानगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रणव गायकवाड याने केले. हे कार्यक्रम एन.एस.एस.चे प्रमुख प्रा. रेवणसिद्ध बकरे , डॉ. मुमताज शेख यांनी आयोजन केले होते.






















