अक्कलकोट – तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ पैकी चार व पंचायत समितीच्या १२ गण पैकी आठ जागा भाजपा ने आ सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली न जिंकुन वर्चस्व राखले . . शिंदे शिवसेना ने जिप दोन प स . च्या चार जागा जिकुन तालुक्यात खाते उघडले . मात्र जेऊर जिप गट व मंगरूळ जिप गट पाटलांनी गड राखला नसल्याने कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ला धोक्याची घंटा वाजलीआहे . आ सचिन कल्याण शेट्टी यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी शिंदेसेना कांग्रेस राष्ट्रवादी संयुक्त आघाडी ला जि प पस नि व डणुकीत मतदारांनी मोठे यश दिल नाही .
जनतेनीआ सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर विश्वास व्यक्त केला . पंचायत समिती मध्ये बहुमत दिले . .मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यामुळे आ . सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यात मोठया प्रमाणात विकास कामे मार्गी लावली . यामुळे भाजपा ला नपा निवडणुकीत दुधनी न पा वगळता अक्कलकोट मैंंदर्गी नपा मध्ये मोठे यश मिळाले . आ कल्याणशेट्टी ना शह देण्यासाठी शिंदे सेना , कॉग्रेस ‘राष्ट्रवादी कॉग्रेस संयुक्त आघाडी जिप पस निवडणुकीत संयुक्तपणे उतरली .शिंदे सेना कॉग्रेस , राष्ट्रवादी ‘ कॉग्रेस संयुक्त आघाडी करूनही पंचायत समिती अक्कलकोट मध्ये बहुमत मिळू शकले नाही . आ .सचिन कल्याणशेट्टी यांच्यावरच जनतेनी विश्वास व्यक्त केला . भाजपाने चप्पळगाव जिप पस चप्पळगाव कुरनुर वागदरी नागणसुर जिंकले शिवाय विरोधकांच्या बाले किल्ल्यातील जिप जेऊर नागणसुर मंगरुळ व पस जेऊर दहिटणे सुलेरजवळगा मंगरूळ ही काबीज केली . आ . सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यातील विवास कामे मार्गी लावल्याने जनतेनी विकास कामानां पसंती दिली आहे .
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मतदार संघावरील प्रभावामुळे सलगर जिप गटामध्ये व सल ग र मुगळी पस गणात ‘ शिदे सेनेला यश मिळाल . नागणसुंर जिप मध्ये निसटता पराभव झाला .
कै . आ . तानवडे होम ग्राऊन्ड मुळे वागदरी जिप गटात प्रविण ‘ तानवडे या नी जिप गड राखला .
जेऊर जिल्हा परिषद गट व गण कै आ महादेव पाटील यांचा बालेकिल्ला मात्र तालुका कॉग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन पाटील याना गड राखता आला नाही .
कै .माजी आ सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रभावाखालील मंगरूळ मंगरूळ जिप गटात भाजपाने मुसंडी मारली . जिप चे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील माजी पस .सभापती संजीवकुमार पाटील यांना मंगरूळ जिप गड पस गण राखता आला नाही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ससाठी धोक्याची घंटा वाचली आहे
नवे नेतृत्व नवी पिढी
जिप चप्पळगाव गटात शांभवीताई कल्याणशेट्टी वागदरी जिप मध्ये प्रविण तानवडे’ सलगर जिप मध्ये शिवराज म्हेत्रे ” पस चप्पळगावमध्ये सागर कल्याणशेट्टी , तोळणुर मध्ये शितल म्हेत्रे या नव्या तरुण युवा कडे नेतृत्व जात आहे .
























