Friday, May 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केवळ हस्तांदोलन टाळणे पुरेसे नाही; भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करा ! 

तरुण भारतbyतरुण भारत
February 14, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे/अहिल्यानगर – पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२६ पासून श्रीलंकेतील कोलंबो येथे प्रारंभ होणाऱ्या ‘आयसीसी टी-२० वर्ल्ड कप’ क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतासोबत सामना खेळण्याची तयारी दर्शवली असली, तरी भारत सरकारने या प्रस्तावाला बळी पडू नये. ‘‘जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नये,’’ ही भारताची ठाम भूमिका असायला हवी. क्रिकेटच्या मैदानात केवळ हस्तांदोलन टाळून पाकिस्तानचा निषेध करणे पुरेसे नाही. क्रिकेटच नव्हे, तर कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी संबंध ठेवू नये. ‘रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत’, अशी ठाम भूमिका भारत सरकारने घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने ठिकठिकाणच्या आंदोलनातून केली.

राजाराम पूल, सिंहगड रस्ता, पुणे या ठिकाणी झालेल्या आंदोलनात सनदी लेखापाल आणि अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे, राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या अधिवक्ता (सौ.) मुग्धा बिवलकर, भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. उज्ज्वला गौड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले आदी मान्यवर उपस्थित होते. अशाच प्रकारे अहिल्यानगर येथील दिल्ली गेट येथेही निषेध आंदोलन करण्यात आले होते. तसेच सातारा, कोल्हापूर आणि राज्यभरात ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करण्याची आग्रही मागणी समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली.

या संदर्भात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताने ‘सिंधू जल करारा’च्या वेळी ‘‘पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही,’’ अशी कणखर भूमिका घेतली होती. तीच भूमिका क्रिकेट संदर्भातही घ्यावी. सीमेवर आमचे जवान रक्त सांडत असतांना आणि देशात ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी गंभीर मोहीम सुरू असतांना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे, हा आपल्या जवानांचा अन् देशप्रेमी जनतेचा घोर अपमान आहे.

पाकिस्तानी खेळाडू हे केवळ खेळाडू नसून अनेकदा ते भारतविरोधी अजेंडा राबवतांना दिसतात. शाहीद आफ्रिदी आणि जावेद मियांदाद अनेकदा काश्मीरवर गरळ ओकतात, तर शोएब अख्तरने उघडपणे ‘गझवा-ए-हिंद’चे (भारतावर इस्लामिक आक्रमणाचे) समर्थन केले होते. अशा मनोवृत्तींच्या खेळाडूंसोबत भारताने का खेळायचे?

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी खेळाडू मुस्तफिझुर रहमान याला ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघातून वगळण्यास भाग पाडले आहे. तीच कठोर भूमिका आता पाकिस्तानसोबत घ्यायला हवी. खेळ आणि आतंकवाद हातात हात घालून चालू शकत नाहीत. भारत सरकारने ठणकावून सांगावे, अशी मागणी समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली.

Post Views: 23
Previous Post

पराभावाने खचुन न जाता कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने लढावे – जिल्हाध्यक्ष शटगार

Next Post

स्वच्छ व धूळमुक्त पंढरपूर कामास नगराध्यक्षाकडून सुरुवात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्वच्छ व धूळमुक्त पंढरपूर कामास नगराध्यक्षाकडून सुरुवात

ताज्या बातम्या

ज्येष्ठांना प्रवास मोफत मग स्वच्छता अधिभारचे दोन रुपये का नागरिकांचे सवाल

May 1, 2026

इतिहास सांगणाऱ्या महानगरपालिकेला ६२ वर्षे पूर्ण

May 1, 2026

बापरे मुंबईच्या तिकिटाला मोजावे लागणार १४ हजार

May 1, 2026

बालविवाह प्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा

May 1, 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी केले जनगणने संदर्भात आव्हान

May 1, 2026

रस्ता खोदल्याने पाण्याचे डबके वालसावंगी पारस सिमेंट रस्त्याचे काम महिन्यापासून बंद

April 30, 2026

सिंहगडच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

April 30, 2026

सोलापुरात आयपीएल फॅन पार्क ; क्रिकेटप्रेमींसाठी स्टेडियमसारखा थरार

April 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0839717

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697