सोलापूर – विदेशी दारूची बनावट लेबले तयार करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईत १३.१६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ९ ते १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग सोलापूर यांच्या कार्यालयास मिळालेल्या गुप्त बातमी नुसार मुस्लिम पाच्छा पेठ. येथे सापळा लावून बनावट विदेशी दारू तयार करण्याकरिता लागणारे १८० मिली क्षमतेची रॉयल स्टंग व्हिस्को, इंपिरियल ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की, मॅकडोवल नं. १ व्हिस्कीची बनावट लेवलांची वाहतुक करताना अॅटो रिक्षा क्र. MH-१३-CT-०३७० मधून १५७५०० वनावट लेवले जप्त करून आरोपी समिर रशिद अंविलखिचडे रा. मुस्लिम पाच्छा पेठ, आसिम कासिम बंल्लारी रा. फ़्राक्रोद्दीन नगर झोपडपट्टी, सोलापुर यांना ताब्यात घेतले. जप्त लेबलांची प्रिंटीग व कटींग करून देणारा इसम प्रकाश विठ्ठल चन्ना रा. शनिवार पेठ सोलापुर याच्या श्रेया ऑफसेट, कमटम वसाहत, एमआयडीसी, सोलापुर येथून लेवलांचे छाप/डाय मशीन, लॅमीनेशन पेपर इ. साहित्य जप्त केले. त्यानंतर सदर लेवलांचे डिझाईन बनविणारे आरोपी सोमनाथ बाळासाहेव कदम, सुलतान महेबुबपाशा शेख दोघे रा. लातुर याना बंकट प्रिंटर्स लातूर येथून ताब्यात घेऊन त्यांचेकडून डिझाईन वनविण्याचे साहित्य जप्त केले.
पुढील तपासात दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी लातूर अंबाजोगाई रोडवर बनावट लेवलांची खरेदी करणारे व या टोळांचे म्होरक्या महेश वालासाहेव स्वामी, गोविंद लक्ष्मण काळे दोघे रा. केज.जि.बीड याना बनावट लेबले. गोवा बनावटीचे विदेशी मद्य व वाहन क्र. MH-०४ / ES-७६१० जप्त करण्यात आले. या गुन्हयात एकुण दोन वाहने, ०७ आरोपी व १५८५०० बनावट लेबल व गोवा बनावटीचे मद्य असे एकुण रू.१३,१६००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई निरीक्षक जे. एन. पाटील, अ. व्ही. घाटगे, तसेच दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, समाधान शेळके, राम निंबाळकर, आर. एम. कोलते, सुखदेव सिद, शिवकुमार कांबळे, सचिन शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय चव्हाण, मुकेश चव्हाण, जवान, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, वसंत राठोड, चेतन व्हनगुंटी. कु.दिपाली सलगर जवान व कर्मचारी यांनी पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार हे करत आहे.




















