चिमुकल्या बाळाची आई, जेव्हा हिरकणी बनून पोटतिडकीने बाळाला होणाऱ्या त्रासाची व्यथा सर्वांसमोर मांडते आणि याची माहिती मिळताच आरोग्यमंत्री या नात्याने, तितक्याच तत्परतेने ती समस्या सोडवली जाते. विधिमंडळातील हिरकणी कक्षाचा चेहरा मोहराच २४ तासांच्या आत आरोग्यमंत्र्यांनी बदलून टाकला. विशेष म्हणजे या हिरकणीची अडचण सोडवणारा तानाजीच ठरला. इतिहासाच्या घटनेची वर्तमानात उजळणीच झाल्याचं अनेकांना वाटलं.
एका आईची आर्त हाक मंत्रीमहोदयांनी जाणली अन् स्वत: लक्ष घालून यंत्रणा उभारली. हिरकणी नावाचा मोठा इतिहास आहे, तोच तानाजी नावाचाही आहे. दोन्ही नावं इतिहासावर आज पुन्हा एकदा खरी उतरली आहेत. मंत्रीमहोदय तानाजीराव सावंत यांच्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होतंय. कारण, आज त्या ५ महिन्यांच्या बाळाला घेऊन स्वत: मंत्रीमहोदय हिरकणी कक्षात दाखल झाले. म्हणूनच आमदार सरोजताई अहिरे यांनीही आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले.
Post Views: 111