सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवभक्त बेडर कण्णप्पा व श्रीसंत वीरशैव कक्कय्या महाराज तसेच संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवभक्त बेडर कण्णप्पा व श्री संत वीरशैव कक्कया महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,सभागृह नेते नरेंद्र काळे, गटनेते अमोल शिंदे, नगरसेविका अश्विनी चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते रमेश होटकर, लक्ष्मीदास सोनकवडे, अशोक शिंदे,मुन्ना कटके, कवी मारुती कटकधोंड, धनंजय झंपले, श्री मिनगुळे, दीपक मस्के, विनोद माने, चंद्रकांत मानवी, मनोहर नारायणकर, संतोष कदम, सर्वाजी होटकर, तिप्पना इंगळे, विनोद होटकर,शांतराम शिंदे, दीपक नारायणकर,देवेंद्र सोनसाखळे, राजेश मिनिगुळे, स्वप्निल झंपले, राजेश झंपले अशोक झंपले, मार्गप्पा मस्के यांच्यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.




















