सोलापूर – हत्तुरे वस्ती येथील हरळय्या नगर येथील संत रविदास बहुउद्देशिय सामाजिक मागासवर्गीय संस्था व फ्रेंन्डस ग्रुप च्या संयुक्त विद्यमानाने संत रोहिदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त प्रतीमा पुजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते श्री. सुधीर खरटमल यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रभाग क्रमांक 25 चे नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हतुरे, सुधीर खरटमल यांच्यासह सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने शाल, फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी प्रभाग क्र. 25 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व रितेश हतुरे, प्रा. राहुल बोळकोटे सर, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक उमेदवार समाजसेवक राजू काळे, सोलापूर महानगरपालिका समूह संघटक अधिकारी शशिकांत वाघमारे, शक्ती कटकधोंड व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी सुधीर खरटमल यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की संत शिरोमणी रोहिदास महाराज हे १५ व्या शतकातील महान समाजसुधारक, कवी आणि भक्ती चळवळीतील संत होते. ज्यांनी समता, मानवाधिकार आणि श्रमाचे महत्त्व शिकवले समतेचा संदेश देणारे महान संत म्हणुन रोहिदास महाराज यांचा उल्लेख केला जातो. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची आपणा सर्वांना गरज आहे.
संत रोहिदास महाराजांनी आपल्याला शिकवले की, देव हा मंदिरात नसून तो प्रत्येक माणसाच्या, खऱ्या मनाच्या आणि शुद्ध अंत:करणात वास करतो. त्यांनी जाती-आधारित भेदभाव पूर्णपणे नाकारला. त्यांच्या मते,”माणसाची जात त्याच्या कर्माने ठरते, जन्माने नाही.” सर्वधर्म समभाव हा संदेश रोहिदास महाराजांनी दिला आणि तोच वसा अन वारसा शिवानंद कांबळे व राहुल कोरे याचे मंडळ जपतो आहे असे गौरवउदगार या प्रसंगी त्यांनी काढले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल कोरे, कार्याध्यक्ष शिवानंद कांबळे, सचिव राकेश कोरे, खजिनदार ज्ञानेश्वर बनसोडे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राकेश कोरे यांनी तर आभार शिवानंद कांबळे यांनी मानले.




















