Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दोन कुटुंबांचा माणुसकीचा दीप; स्वतःचे दुःख बाजूला ठेवत मरणोत्तर नेत्रदानास संमती

तरुण भारतbyतरुण भारत
February 18, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पूर्व भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तरुणांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. बोल्ली मंगल कार्यालय, पोशम्मा मंदिर परिसरातील रहिवासी बालाजी गंगुल तसेच चिप्पा भाजी मंडई शेजारील रहिवासी शशिकांत कोंडा या दोन युवकांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

या वेदनादायी प्रसंगातही संबंधित कुटुंबीयांनी माणुसकीचे दर्शन घडवत मरणोत्तर नेत्रदानासाठी संमती दिली. शोकाकुल कुटुंबीयांशी नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगितले. नेत्रदानामुळे अंधारात जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येऊ शकतो, ही उदात्त भावना स्वीकारत कुटुंबीयांनी समाजहिताचा विचार करण्याचे मोठे धैर्य दाखवले.

यानंतर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे रीतसर मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

स्वतःच्या घरात दुःखाचा अंधार असतानाही इतरांच्या आयुष्यात उजेड पेरणाऱ्या या कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा घटनांतून खरी माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव अधोरेखित होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

एक सामाजिक कार्यकर्ता व नगरसेवक म्हणून नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांनी दोन्ही कुटुंबांच्या कठीण काळात त्यांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या कार्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या नेत्रपेढी व नेत्रदान समुपदेशक श्री विकास लिंगराज यांचे विशेष सहकार्य लाभले.

यापूर्वी दोन ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान तसेच सहा व्यक्तींच्या मरणोत्तर नेत्रदानासाठी कुटुंबीयांशी केलेल्या प्रयत्नांबद्दल शासनाकडून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Post Views: 44
Previous Post

‘त्रिमूर्ती महाशिवरात्री’ ही निराकार परमात्मा शिवाच्या अवतरणाचा महोत्सव

Next Post

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागात “नूतनीकरणीय ऊर्जा” विषयावर मार्गदर्शन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागात “नूतनीकरणीय ऊर्जा” विषयावर मार्गदर्शन

ताज्या बातम्या

सोलापूर–हैद्राबाद विमानसेवेची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी उत्साहाचा जल्लोष

April 17, 2026

दयानंद महाविद्यालयाच्या तरुणांनी महाविद्यालयापासून आंबेडकर उद्यान पर्यंत काढली मिरवणूक

April 17, 2026

वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेस प्रारंभ

April 17, 2026

दान – परोपकारातून आत्मशुद्धी; श्रावक कल्याणाचा प्रभावी मार्ग

April 17, 2026

चिमुकली समोरच दिली तहसीलदार बाबाला धमकी तुला मारूनच टाकतो #viral #marathinews

April 17, 2026

गुप्तधन मिळवून देतो म्हणून महिलेची केली फसवणूक

April 17, 2026

अल्पवयीन मुलीचे गुपचूप केले लग्न गरोदरपणामुळे फूटले बिंग

April 17, 2026

ऊन वाढला शेतीसाठी पाणी द्या पालकमंत्र्यांनी घेतली ऑनलाइन बैठक

April 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0815215

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697