बार्शी – वैश्विक प्रेम दिनाचे औचित्य साधून स्वर संध्या ग्रुप आयोजित ” मैने प्यार किया” हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम १४ फेब्रुवारी वैश्विक प्रेम दिनानिमित्त वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे संपन्न झाला. मायबोली सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष कवी मुकुंदराज कुलकर्णी, सचिव डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. वैशाली मोहिरे, संगीत शिक्षक प्रसाद सहस्त्रबुद्धे व दिपाली सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सर्व मान्यवरांचा सन्मान तुळशीचे रोप देऊन करण्यात आले. या प्रेम गीतांच्या संगीत मैफिलीत अनेक अविट मधुर मराठी हिंदी गीते सादर झाली गायक कलावंत डॉ. मदन देगावकर, वर्षा रसाळ, सूर्यकांत वायकर,मधुसूदन चांडक,सी. ए. डॉ. तेजस्वी गपाट, गिरीजा पोळ यांनी नवी जुनी अशी सुंदर प्रेमगीते सादर केली. या कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी असे निवेदन प्रा. माधुरी शिंदे, प्रा. मंजुषा राऊत,प्रा. प्रेमा राऊत यांनी केले.
यावेळी प्रेक्षक प्रतिनिधी म्हणून १४ फेब्रुवारी वाढदिवस असणारे प्रा. विभुते सर यांनी असे सुंदर दर्जेदार स्वर संध्या ग्रुपचे कार्यक्रम तिकीट लावून महाराष्ट्रभर व्हावेत, अशी भावना व्यक्त केली. तसेच या कार्यक्रमाला उज्वला योगेश सोपल, राजश्री गवळी, सरपंच सिनेमाचे निर्माते महादेव जाधवर, व १४ फेब्रुवारी लग्न वाढदिवस असलेले अजय खंडेलवाल यांचा सपत्नीक तूळशीची रोप देऊन सन्मान करण्यात आले.
या सांगितमय कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी हॉल पूर्ण रसिक प्रेक्षकानी भरला होता.


























