अक्कलकोट – तालुक्यातील चप्पळगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शांभवी कल्याणशेट्टी व चप्पळगाव पंचायत समिती गणात भाजपचे सागर कल्याणशेट्टी प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल अडत व्यापारी हणमंत बणजगोळे बोरेगाव. ता. अक्कलकोट यांच्या हस्ते आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी चप्पळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जवळपास सर्वच गावांमध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे .भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे . शासकीय योजनांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बोरेगावचे सरपंच गौरीशंकर स्वामी स्वप्नील बणजगोळे माणिकचंद धनशेट्टी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.






















