अक्कलकोट : तालुक्यात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट ट्रस्ट संचलित लायन्स शिशु विकास मंदिर व लायन्स प्राथमिक शाळा अक्कलकोटचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषक वितरण समारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात श्री कमलाराजे चौकातील नगरपरिषदेचे प्रियदर्शनी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
दरम्यान सोहळ्याचे दीपप्रज्वलन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा- अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. यामध्ये सोलापूर येथील अनिल राठोड यांनी प्रशिक्षण दिलेल्या छावा व रामायण या पात्रांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या सह मेरे देश की धरती…..!, मुकुंदा, मुकुंदा….!, लाडाची गं…..!, यल्लमा, यल्लमा…..!, ढिपांग…..!, वाऱ्यावरती…..! या विविध गाण्याच्या नृत्याने श्रोत्यांची मने जिंकली.
विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा- अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास लायन्स क्लब अक्कलकोट ट्रस्ट चे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन राजेंद्र हत्ते, लायन्स क्लब अक्कलकोट अध्यक्ष अभय खोबरे, माजी प्रांतपाल राजशेखर कापसे, चार्टर मेंबर संस्थापक डॉ. अरुण परिचारक, झोन चेअर पर्सन मल्लिकार्जुन मसुती हे प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी क्लब चे उपाध्यक्ष सुभाष गडसिंग, सचिव शिरीष पंडित, शिवशरण खुबा, खजिनदार विठ्ठलराव तेली, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ साखरे, सहीद वळसंगकर, प्रकाश उण्णद, सुभाष खमितकर, महिबूब सलगरकर, सिद्धय्या मठ, शिवपुत्र हळगोदे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका- श्रीदेवी खुने, शिशु विकास मंदिरचे मुख्याध्यापिका- महानंदा निलगार, सांस्कृतिक विभाग प्रमुख गौरीशंकर चनशेट्टी, कार्याध्यक्षा स्नेह संमेलन श्रद्धा बागुल, विध्यार्थी प्रतिनिधी चि. समर्थ चितली, कु. जान्हवी गव्हाणे, शिक्षकेतर कर्मचारी रमेश शिंदे (माकणे) यांच्या सह सर्व संचालक मंडळ व सदस्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदिजन बहुसंख्येने उपस्थित होते.






















