अक्कलकोट : सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समाजबांधवांचे संघटन असा दुहेरी संगम नुकताच तुळजापूर येथे पाहायला मिळाला. निमित्त होते, गौड-कलाल समाजाच्या भव्य स्नेहसंमेलन आणि उपवधू-वर परिचय मेळाव्याचे.
या सोहळ्याला सोलापूर, पुणे, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची उंची वाढवली.
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते सरदार सर्वई श्री पापन्ना गौड महाराज यांच्या शौर्यकथेवर आधारित सादरीकरण. यातून नव्या पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची नव्याने ओळख झाली. यावेळी सरदार पापन्ना गौड यांच्यावरील पुस्तकाचे लेखक व प्रकाशक धर्मा पुरुषोत्तम यांची विशेष उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडला. यावेळी तसेच विदर्भ गौड समाज संघटनेचे अध्यक्ष नारायण गौड, लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास बोडगे, सोलापूर-धाराशिव-लातूर संमेलनाचे अध्यक्ष तिरुपती बुरुगवार गौड, उपाध्यक्ष दत्तात्रय बुर्रा गौड, कार्याध्यक्ष कैलास गौड कालापल्लीवार, कार्यवाहक चेतन बोडगे, राजू गोडसेलवार, कोषाध्यक्ष श्रीनिवास गुल्लापल्ली , कार्यवाहक चेतन बोडगे, प्रकाश बोडगे, चद्रकांत बोडगे
भंडारी गौड न्याती संस्थेचे अध्यक्ष यल्लादास लचमापुरे, अंज्याया पल्ली, श्रीनिवास गौड ,संजीव सुगरे .
भंडारी फाउंडेशनचे व्यंकटेश बब्बूर, महेश आंबट.
सोलापूर भंडारी समाज सेवा संघाचे प्रताप पल्ली, व्यंकटेश मरेपल्ली, व्यंकटेश लचमापुरे, रवी चिंचोल , शैलेश मरपेल्ली , वेणु गोपाल मरपेल्ली यांच्यासह लातूर कळंब उमरगा पंढरपूर, मोहोळ, टेंभुर्णी येथील शेकडो पदाधिकारी व हजारो समाजबांधव या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
—
मान्यवरांची मोठी मांदियाळी
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे विधानपरिषद सदस्य जगदेव गुत्तेदार, उद्योजक राजा भाऊ गुल्लापल्ली, प्रविण बुरुगवार, सुरज बुरुगवार, धारूरचे उद्योजक तथा माजी नगरसेवक संजीत कोमटवार, वैरागचे नगरसेवक सतीश गुत्तेदार, विजय लचमापुरे आजीबाबू भंडारी संतोष सुगरे ,शिवाजी गुत्तेदार, चंद्रकांत तेलंग, परमेश्वर तेलंग, विजय तेलंग, पत्रकार नागेश कलाल, सुदर्शन तेलंग सायना सारोळे , शहानू तेलंग पुंडलिक तेलंग, सुरेश घाटे कृष्णा हनगल, राजू कोकण्डा पंडित सुगरे, कृष्णा सुगरे, दत्तू तेलंग आदी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर समाजाचे महिला उपस्थित होते.
—
बायोडाटाची पीडीएफ थेट मोबाईलवर
या वधू-वर परिचय मेळाव्यात विवाहयोग्य मुला-मुलींच्या कुटुंबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात १९२ उपवर (मुले) आणि ५७ उपवधू (मुली) अशी एकूण २४९ जणांची नोंदणी झाली. सद्यस्थितीत या सर्व माहितीचे आणि बायोडाटाचे फोटोसह संगणकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत हे काम पूर्ण करून, संपूर्ण पीडीएफ यादी संपर्क व्यक्तींमार्फत समाजबांधवांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे.






















