Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वंदे मातरमला दिलेल्या सर्वोच्च सन्मानाला विरोधकरण्यासाठी कांग्रेसने गाठली खालची पातळी !

तरुण भारतbyतरुण भारत
February 21, 2026
in india
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिल्ली – सनातन संस्थेने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १३ ते  १५ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित केला होता. या निमित्ताने देशभरातील विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातून हजारो हिंदुत्वनिष्ठ येणार असल्याने त्यांच्या समोर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संकल्पनेनुसार ‘वंदे मातरम’चा गौरव व्हावा, या दृष्टीने सनातन संस्थेने वंदे मातरम् गीताचे भव्य प्रदर्शन तीन दिवस भारत मंडपमच्या शेजारील हॉल क्र. १२ मध्ये आयोजित केले होते. तसेच मुख्य कार्यक्रमात वंदे मातरमचे समूह गान आयोजित केले होते. त्याचबरोबर या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शस्त्रे होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. मंत्र्यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले होते आणि त्यासाठी नियमित शासकीय पद्धतीने आम्ही शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सर्व प्रशासकीय मान्यता घेऊन शासनाने त्याला मान्यता दिली. या व्यतिरिक्त उर्वरित कार्यक्रम हा सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाचा होता आणि त्याचे नावच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ असे होते, त्यामुळे त्याला हिंदू राष्ट्राचा महोत्सव म्हणून खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे, असे उत्तर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिले आहे.

          सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. वर्तक पुढे म्हणाले की, या कार्यक्रमात कोणतेही भारतीय संविधान विरोधी भाषण झाले नाही. सर्व वक्त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची बाजू मांडली आणि त्यावर उपाययोजना सांगितल्या. प्रत्यक्षात कांग्रेसचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री घटनात्मक पदावर असताना “कांग्रेस मतलब मुस्लिम और मुस्लिम मतलब कांग्रेस” अशी घटनाविरोधी घोषणा करतात, काँग्रेसचे तत्कालीन प्रधानमंत्री “इस देश की साधनसंपत्ती पर पहिला अधिकार मुसलमानो का है”, असे वक्तव्य करतात. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा नाकारूनही धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण घोषित करतात, केरळमध्ये काँग्रेसचे नेते बीफ बैन ला विरोध करण्यासाठी रस्त्यावर गोहत्या करतात, हे सर्व संविधान विरोधी नाही का? त्यामुळे काँग्रेसने अगोदर स्वतःची पापे बघावीत.

         काँग्रेसने केलेले शिखांचे हत्याकांड आजही लोक विसरलेले नाहीत, तसेच बाटला हाऊसच्या आतंकवाद्यांसाठी अश्रू काढणे, मुंबई येथील २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात कसाब आदी पाकिस्तानी आतंकवादी सहभागी असल्याचे पुरावे असताना कांग्रेसचे नेते “२६/११ का हमला RSS की साझिश” या रा. स्व. संघाला दोषी ठरवणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहतात.

         काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तर आता जाहिरपणे कबूल केले आहे की, मी हिंदू आतंकवाद शब्दाचा वापर करायला नको होता, मात्र पक्षाने सांगितले म्हणून केला. त्यांना ही हिंदूंना आतंकवादी ठरवण्याची थियरी कोणी सांगितली होती, याचा खुलासा कांग्रेस पक्ष का करत नाही? याच थियरीच्या आधारे सनातन संस्थेला ही खोट्या प्रकरणांत गोवण्यात आले होते. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे; मात्र कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नसतानाही, आम्हाला आतंकवादी संबोधणाऱ्या कांग्रेसच्या नेत्यांवर, तसेच संबंधित पोर्टलवर आम्ही बदनामीचे खटले दाखल करणार आहोत, असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.

Post Views: 50
Previous Post

प्रभावती सारोळकर यांचे हिंदूत्वाचे कार्य पुढे नेण्यासाठी महिला व युवतींनी पुढे येण्याची गरज : पंडित 

Next Post

डाँ.बोबडे मल्टिस्टेट हाँस्पिटलने कुर्डूवाडीसह तालुक्याची गरज भरून काढली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डाँ.बोबडे मल्टिस्टेट हाँस्पिटलने कुर्डूवाडीसह तालुक्याची गरज भरून काढली

ताज्या बातम्या

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मिळेनात ; क्रीडा पुरस्कारांची तारीख पे तारीख

April 29, 2026

नाहक बदनामी केली तर अब्रुनुकसानीचा दावा करणार अजय दासरी

April 29, 2026

महानगरपालिकेत लोकसभा हक्क दिन साजरा

April 29, 2026

उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे

April 29, 2026

आत्मशुद्धीच्या दिव्या तेजाने उजळलेली डब्ल्यू आय टी जैन टेंपलची पावन पहाट

April 29, 2026

मंठा तालुक्यात अर्धनग्न आंदोलन

April 29, 2026

सोलापूरचा धाराशिववर दणदणीत विजय

April 29, 2026

पेवा येथे १७ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0837163

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697