पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव पोलीस दूरक्षेत्र हे सोलापूर, सातारा, सांगली या तिन जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारे मोठी बाजारपेठ असणारे गाव आहे .या पोलीस दूरक्षेत्रा अंतर्गत पिलीव, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, चांदापुरी, पठाणवस्ती, झिंजेवस्ती, कुसमोड, काळमवाडी या जवळपास नऊ गावांचा या दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो.
या भागात सतत विविध कारणावरुन भांडण तंटे, चोऱ्या ,मारहाण, दारुवरुन सतत तंटे होत असतात. याठिकाणी शिंगोर्णी ते पठाणवस्ती याचा विचार करता अंतर खुप असल्यामुळे राञी अपराञी काही घटना घडल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी मोटारसायकलवरून जाणे अतिशय जिकरीचे तसेच घातक आहे . पिलीवसह या भागात चोऱ्यांचे प्रमाण मोठे आहे .
याठिकाणी राञी पोलीसांना सायरन वाजवित गस्त घालणे किंवा पेट्रोलींग करणे यामुळे मुश्कील होत आहे .म्हणून या पोलीस दूरक्षेत्राला ताबडतोब चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर जिल्ह्या उपाध्यक्ष राहुल मदने यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनावर केली आहे .याठिकाणी जोपर्यंत चारचाकी वाहन उपलब्ध होत नाही तोपर्यंत पोलीस यंत्रणेला तपास करणे किंवा राञी अपराञी होणारया चोरांच्या घटनेवर नियंत्रण मिळविणे अशक्य आहे .
फोटो _ पिलीव दूरक्षेत्राला चारचाकी वाहन उपलब्ध करून दयावे यासाठी निवेदन देताना राहुल मदने.





















