बार्शी – शहर व तालुक्याच्यावतीने उडान फाउंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव भव्यदिव्य स्वरुपात साजरी करण्यात येते. याही वेळी उडान फाउंडेशनच्यावतीने शिवसृष्टी या ठिकाणी पुष्पहार अर्पण करुन व समाजातील वंचित दुर्बल घटकापैकी पारर्लिंगी, सफाई कर्मचारी, नर्स (मावशी), माता भागिनींचा यावेळी शिवजयंतीनिमित्त गौरव करुन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात आली.
पारर्लिंगी समुदाय हा समाजाचा अविभाज्य भाग असून, सांस्कृतिक, सामाजिक आणि मानवी हक्कांच्या क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ते समाजात सर्वधर्म समभाव आणि विविधतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. हा समुदाय धार्मिक भेदभाव करत नाही. सर्वधर्म समभाव मानून हे लोक वेगवेगळ्या धार्मिक स्थळांचा आदर करतात, जे सामाजिक सलोख्यासाठी गरजेचे आहे.
सफाई कामगार हे शहरांचे आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण सुरक्षित ठेवणारे खरे ‘स्वच्छता दूत’ आहेत. त्यांच्या अतुलनीय कष्टांमुळेच शहर आणि नागरिकांचे आरोग्य टिकून राहते.
परिचारिका मावशी रुग्णांना २४x७ उपचार, काळजी आणि मानसिक आधार देतात, माता-बाल संगोपन, या केवळ नोकरी करत नाहीत, तर रुग्णांना नवीन जीवन मिळवून देण्यासाठी निष्ठेने सेवा देतात. ज्यामुळे त्यांना आरोग्य व्यवस्थेचा ‘कणा’ मानले जाते.
यासाठी त्यांचा उडान फाउंडेशनच्यावतीने गौरव करण्यात आला, तसेच शिवजयंतीचा दुसरा उपक्रम म्हणून एका गरजवंत कुटुंबांला लहान बाळाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी कार्यमाचे अध्यक्ष सचिन वायकुळे, प्रमुख पाहुणे डॉ. मौलाना शेख, डॉ. गुलाब अंगारशा, सुलतान शेख, ,जय शिवराय प्रतिष्ठान अध्यक्ष विजय राऊत, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष टिंकू पाटील, माजी नगरसेवक कय्युम पटेल, सादिक मुल्ला यांनी यावेळी मार्गदर्शन केले तर उडान फाउंडेशन अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, कार्याध्यक्ष शकील मुलाणी, सचिव जमील खान, सहसचिव अख्तर शेख, मोहसीन पठाण, अकिब पठाण, साजन शेख, सामीर वळसंगकर, राजु शिकलकर, रज्जाक शेख, खाजा पठाण, साजिद मुल्ला, तोसिफ बागवान, गणेश गोडसे, स्वप्नील पोकळे, अमोल झांबरे तसेच युवा उडान फाउंडेशन अध्यक्ष सलमान बागवान, रहीम शेख, शहबाज मुल्ला, शहाबाज मुलाणी असे असंख्य मुस्लिम मावळे, शिवस्मारक येथे उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण कोकाटे यांनी तर जमील खान यांनी आभार मानले.























