सोलापूर – भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि ज्यांनी अनेक सामाजिक कामे निष्काम भावनेने केले अशा श्रीनिवास दायमा यांचे स्वीकृत नगरसेवक म्हणून सोलापूर महानगरपालिकेत निवड झाल्या निमित्त शिंगवी ज्वेलर्स चे प्रमुख प्रदीप कुमार शिंगवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अशा निस्सिम कार्यकर्त्याचे पश्चिम मंगळवार पेठ येथील सुप्रसिद्ध अशा शिंगवी ज्वेलर्स परिवारातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत तापडिया, विनय शिंगवी, गोपाल दायमा,अविनाश म्हमाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीनिवास मालपुरी यांनी केले तर आभार श्रीकांत दायमा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश कांदीकटला, गणेश नादरगी, दिनेश वेदपाठक तसेच सर्व स्टाफ यांनी प्रयत्न केले.
























