Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अर्धनारी–माचनूर बंधाऱ्यावर १०० दरवाजे बसविले; खा.प्रणिती शिंदे यांनी बंधाऱ्याची केली पाहणी

तरुण भारतbyतरुण भारत
February 23, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – अर्धनारी–माचनूर येथील बंधाऱ्याची पाहणी खासदार प्रणिती शिंदे यांनी आज केली. येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सातत्याने मांडलेल्या मागणीची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे उजनी पाटबंधारा विभागामार्फत या बंधाऱ्यावर तब्बल १०० दरवाजे बसविण्यात आले. या कामामुळे परिसरातील पाणी साठवण क्षमतेत लक्षणीय वाढ होऊन शेकडो शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळत आहे.

बंधाऱ्यावर दरवाजे बसविल्यानंतर नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा निर्माण होत असून अर्धनारी व माचनूर परिसरातील शेती सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढली असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होत आहे.

आज झालेल्या पाहणीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी बंधाऱ्याच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. यावेळी बंधाऱ्यावर विधीवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी अर्धनारी गावचे सरपंच पवार, माचनूरचे माजी सरपंच बबन सरवळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे हे माझे प्राधान्य आहे. बंधाऱ्याचे दरवाजे बसविल्यामुळे पाणी अडवून ठेवता येत असून त्याचा फायदा शेतीसह भूजल पातळी वाढीसाठीही होणार आहे.”

या कामाबद्दल ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच पायाभूत व शेतकरीहिताच्या विकासकामांसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रवीकरण कोळेकर, शहराध्यक्ष राहुल घुले यांच्यासह मनोज माळी, नाथा ऐवळे, रणजीत पाटील, आयेशा शेख, पंडित पाटील, सुनिता अवघडे, अभिमन्यू तात्या बेद्रे, अकबर मुलानी, राजू ठेंगील, संदीप पवार, शहाजी कांबळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 23
Previous Post

स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास दायमा यांचे शिंगवी ज्वेलर्स परिवारातर्फे सत्कार

Next Post

वैराग ग्रामीण रुग्णालयाचा करारनामा रखडला; ११ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वैराग ग्रामीण रुग्णालयाचा करारनामा रखडला; ११ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

संत नामदेव शिंपी समाजातर्फेभाविकांना महाप्रसाद वाटप

संत नामदेव शिंपी समाजातर्फेभाविकांना महाप्रसाद वाटप

June 8, 2026

सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार करणारविठ्ठल नगरी अर्थात पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन

June 8, 2026
जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण, सिडबॉल वाटपातून जनजागृती

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण, सिडबॉल वाटपातून जनजागृती

June 8, 2026
लोकमंगल परिवाराच्या वतीने सांगोल्यात विद्यार्थ्यांचा गौरव

लोकमंगल परिवाराच्या वतीने सांगोल्यात विद्यार्थ्यांचा गौरव

June 8, 2026

ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी ह. भ. प. श्री. काशीनाथ सर्जे यांच्या समवेत पठण

June 8, 2026
कारखान्या वरील पत्र्यावर काम करताना खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू 

कारखान्या वरील पत्र्यावर काम करताना खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू 

June 8, 2026
मध्य रेल्वे ​परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूट उपांत्य फेरीत 

मध्य रेल्वे ​परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूट उपांत्य फेरीत 

June 8, 2026
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

June 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0898503

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697