Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापुरात आता ‘व्हीव्हीआयपी’ विश्रामगृह

तरुण भारतbyतरुण भारत
February 23, 2026
in marathwada
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुळजापूर – तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाची ४३८ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. पुढील काळात जगभरातील पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांची तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून तुळजापूरचा लौकिक जगभरात वाढणार आहे. या लौकिकाला साजेसे भव्य आणि ‘व्हीव्हीआयपी’ विश्रामगृहाला उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १६ कोटी ३५ लाख रुपयांची मान्यताही मिळाली आहे.

लवकरच ३४ हजार चौरस फुटांचे भव्य आणि आधुनिक व्हीव्हीआयपी विश्रामगृह तुळजापुरात उभारले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले विश्रामगृह ५९ वर्ष जुने असल्यामुळे प्रशस्त आणि आधुनिक इमारतीची गरज होती, त्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक व व्हीआयपी मान्यवर दर्शनासाठी येतात. सध्या अस्तित्वात असलेले विश्रामगृह १९६७ साली बांधलेले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत ते अपुरे पडत आहे. त्याचबरोबर विश्रामगृहाची इमारत जुनी झाली आहे. भाविकांचा वाढता ओघ पाहता एका प्रशस्त आणि आधुनिक इमारतीची आवश्यकता असल्याने आपण त्यादृष्टीने प्रयत्न केले आणि नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाला आता उच्च स्तरीय समितने मंजुरी दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या (VVIP) भाविकांच्या निवासाचा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे.

तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा भव्य ‘VVIP शासकीय विश्रामगृह’ इमारतीच्या बांधकामासाठी १६ कोटी ३५ लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. ज्या ठिकाणी ही नवीन वास्तू उभी राहणार आहे, त्या ठिकाणी सध्या तीन जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती आहेत. या इमारती सध्या वापराविना पडून असून, नवीन प्रकल्पासाठी त्या पाडण्यात येणार आहेत. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची (सिटी सर्व्हे क्र. ९०२) असून एकूण क्षेत्रफळ १,१८,९२० चौ.फूट इतके विशाल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत हे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. 

 

असे असेल नवीन व्हीव्हीआयपी विश्रामगृह

प्रस्तावित विश्रामगृहाची इमारत ही ‘जी प्लस टू’ अर्थात तळमजला अधिक दोन मजले अशा स्वरूपाची असून ती पूर्णपणे आरसीसी फ्रेम स्ट्रक्चरमध्ये असेल. या इमारतीचे एकूण जोते क्षेत्रफळ ३,१६८ चौ.मी. (३४,१०० चौ.फूट) इतके भव्य आहे.

विशेष म्हणजे, वास्तुशास्त्रज्ञांकडून या इमारतीचे नकाशे तयार करण्यात आले असून त्याला उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञांची तत्वतः मान्यताही मिळाली आहे. त्यानुसार तळमजल्यावर ४ व्ही.आय.पी. सूट, मीटिंग हॉल, डायनिंग, किचन, चालक रूम तर पहिल्या मजल्यावर २ व्ही.व्ही.आय.पी. सूट, २ सेमी व्ही.आय.पी. सूट आणि दुसऱ्या मजल्यावर २ व्ही.व्ही.आय.पी. सूट, २ सेमी व्ही.आय.पी. सूटच्या बांधकामास मंजुरी मिळाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Post Views: 79
Previous Post

क्रेडाईकडून अॅबस्ट्रॅक्ट आर्टचे अनावरण; शहराच्या सौंदर्यात पडली भर

Next Post

शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबिरात ४५० नागरिकांची तपासणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबिरात ४५० नागरिकांची तपासणी

ताज्या बातम्या

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246084

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!