सोलापूर : शिवजयंतीनिमित्त श्री हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व स्वर्गीय प्रमोद महाजन युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग १२ व्या वर्षी डॉल्बीमुक्त शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बापूजी नगर येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या आरोग्य शिबिरामध्ये एकूण ४५० नागरिक व मुलांची तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरामध्ये रक्तदाब (BP), मधुमेह (Blood Sugar), हिमोग्लोबिन, पूर्ण रक्त तपासणी (CBC), थायरॉईड तपासणी, त्वचारोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच जनरल मेडिसिन तपासणी अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिरासाठी अश्विनी हॉस्पिटल कुंभारी, सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल, एस. एल. हॉस्पिटल, सेंट्रल हॉस्पिटल, सेल्फी हॉस्पिटल तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मोलाची सेवा दिली.
याप्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, देविदास कुमार, अंबादास म्हेत्रे, प्रमोद महाजन युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयंत होलेपाटील, श्री हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर आरगोंडा, हिंदुराष्ट्र सेनेचे शहर अध्यक्ष रवि गोणे, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, हणमंतू श्रीराम आदी मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ बंदपट्टे, गीता गोणे, शिवम्मा बंदपट्टे, अजय गोणे, अमर पोतराज, विनायक कुरापाटी, महेश पेद्दी, लक्ष्मण गुंडेटी, सागर तलवार, सागर सातलोल्लू, सागर म्हेत्रे, किरण शिंगे, दिनेश वल्लापोल्लू, विकास गड्डम, लक्ष्मण दासरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

























