बार्शी – येथील एम. आय. टी. रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दि. १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान क्रीडा सप्ताह, विविध कलागुणदर्शन, स्नेहसंमेलन तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केले गेले होते. या विविध कलागुणदर्शनाच्या सप्ताहात मिसमॅच डे, बॉलीवूड डे, ट्रॅडिशनल डे इत्यादी कार्यक्रम साजरे करण्यात आले. क्रीडा सप्ताहामध्ये क्रिकेट, चेस, कॅरम, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो इत्यादी क्रीडा प्रकार घेण्यात आले.
या क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण दि. २१ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या “असि MIT-२०२६” या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नागेश अक्कलकोटे, विरोधी पक्षनेता बार्शी नगरपरिषद व बार्शी ग्रामीणचे पोलीस इन्स्पेक्टर श्री. डी. आर. ढेरे हे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, सर्व विभागप्रमुख, डीन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा समन्वयक प्रा. चेतन आध्ये व प्रा. दीपाली माळी तसेच व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी महाविद्यालयाचे वार्षिक अहवाल वाचन केले. तसेच भविष्यामध्ये अशाच पद्धतीने सांघिक कार्य करण्याचे सूतोवाच केले. श्री. अक्कलकोटे यांनी आपल्या भाषणामध्ये युवकांचे त्यांच्या भावी करियरसाठी MIT संस्थेचे योगदान किती महत्वाचे आहे आणि आपण मेहनत करुन भविष्य उज्वल करणे गरजेचे आहे. जेणेकरुन भारतातील अभियंते पूर्ण जगासाठी एक उदाहरण ठरेल, असे आवाहन युवावर्गाला केले. स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाटक इत्यादी कला प्रकार सादर केले.
वार्षिक संमेलन यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रसाद प्रतापे, प्रा. सुषमा मुळे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साक्षी पारखे यांनी तर आभार प्रदर्शन विनायक मांडवे यांनी केले.


























