मोहोळ – विधानसभा मतदारसंघात मागासवर्गीय वस्तीसाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्याने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या प्रयत्नाने 2 कोटी रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांनी दिली.याबाबत आमदार राजू खरे यांनी समाज विभाग कल्याण विभागाचे मंजुरीचे पत्रच प्रसार माध्यमाकडे सादर केले आहे.
या पत्रानुसार कोन्हेरी येथे मागासवर्गीय वस्तीत संविधान सभागृह बांधणे साठी 10 लाख, आंबे (ता पंढरपूर ) येथे दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख, पोहरगाव येथे नवबौद्ध घटकाच्या स्मशान भूमी कॉक्रीट रस्ता करणे साठी दहा लाख ढोक बाभूळगाव आंबेडकर नगर येथे समाज मंदीर बांधणे दहा लाख डिकसळ येथे दलित स्मशान भूमीत वॉल कंपाऊंड साठी दहा लाख कोरवली भिम नगर भूमीगत गटार बांधणे साठी दहा लाख, डिकसळ येथे मागास वर्गीय स्मशान भूमीत वॉल कंपाऊंड, पाटकूल आंबेडकर नगर येथे संविधान सभागृह साठी दहा लाख, खंडाळी समाज मंदीर वॉल कंपाऊंड, सय्यद वरवडे दलित वस्तीत संविधान सभागृह, फुल चिंचोली (ता पंढरपूर ) नागनाथ प्रक्षाळे ते वसंत बनसोडे घर रस्ता कॉक्रेटीकरण, जामगाव बुद्रुक स्मशान भूमी वॉल कंपाऊंड ,टाकळी सिकंदर येथे बौद्ध विहार बांधणे, चळे ता पंढरपूर येथे भीमराव मोरे घरापर्यत कॉक्रीट रस्ता करणे चळे (ता. पंढरपूर) येथे कल्याण अंकुर शाळा ते कोयना नगर रोड येथे काँक्रीट रस्ता करणे, औढी आंबेडकर नगर येथे काँक्रिट रस्ता करणे, नजीक पिंपरी दलित वस्तीमध्ये सभागृह बांधणे, चिखली जयद्रत गवळी घर ते बोद्ध विहार येथे काँक्रीट रस्ता करणे, आढेगाव भीम नगर येथे भूमिगत गटार बांधणे अशा कामासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या सहकार्याने सामाजिक न्याय सहाय्य विभाग यांच्यावतीने 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती विद्यमान आमदार राजू खरे यांनी दिली























