सांगोला – परीट समाज सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स. ८ वा. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर वाढेगाव येथील भजनी मंडळाचे भजन झाले.
दु.१२.३० वा. गाडगेबाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, बांधकाम सभापती गोदाताई बनसोडे, नगरसेवक विवेक पाटील, प्रशांत धनवजीर, माऊली तेली, नगरसेविका तनुजा एरंडे, वैशाली झपके, माजी नगरसेवक सतीश सावंत, गजानन बनकर, सोमेश यावलकर, तानाजी पाटील, सुभाष इंगोले, वैजिनाथ घोंगडे, बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, खंडू सातपुते, उल्हास धायगुडे, महादेव वाघमारे, समीर पाटील, संजय देशमुख, संजय बाबर, सचिन भुसे, शंभु माने, विष्णुपंत केदार, फिरोज खतीब, सौदागर केदार, दादा वाघमोडे, सुरेश चौगुले, ऍड.महादेव कांबळे, माजी सैनिक मराळ, लकी कांबळे, सुनिल गायकवाड, सतीश गायकवाड, प्रभाकर बिचकले, बाळू चौगुले, अपर्णा गुरव व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीट समाज सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.























