सोलापूर : येथील द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत यश संपादन केले.
या स्पर्धेत एकूण ११ पुरस्कारांनी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉ. महेश चोप्रा साहेब, प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे , आणि प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सृजनरंग नियतकालिकासाठी डॉ. जी. डी. बिराजदार, डॉ. एन.एन. लोंढे, डॉ. आर. ए. रणवरे, प्रा. एस.एस. मोरे, डॉ. डी. आर. गायकवाड, डॉ. आर. व्ही. शिंदे, डॉ. आर. एच. कुलकर्णी, डॉ. एस. पी. देशमुख यांनी संपादनाची जबाबदारी पार पाडली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
























