कुर्डूवाडी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत दि. 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षा इयत्ता आठवीचा निकाल जाहीर झाला असून सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव टे संचलित,कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंबाड ता. माढा या विद्यालयाने घवघवीत यश मीळवले आहे.
१५ पैकी ११विद्यार्थी उत्तीर्ण
१०० पेक्षा जास्त मार्क मिळविणारे एकूण ७ विद्यार्थी
सरवदे श्रुती लालचंद-143, सरक उत्कर्षा उमेश- 130, टोणपे आरती सचिन -123, सोनवणे अनिशा अनिल – 106, भोसले ओम प्रशांत – 106, टोणपे श्रेया सतीश 103, समर्थ दत्तात्रय गाडे-101 या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक अभिमान ननवरे , भारत हुलगे, ज्ञानेश्वर चव्हाण , फैय्याज तांबोळी , यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार संजयमामा शिंदे, प्राचार्य जवानसिंग रजपूत जे. एन, यशवंत प्रायमरी स्कूल चे मुख्याध्यापक सोमनाथ होणमोटे तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

























