सांगोला – तालुक्यातील एखतपूर येथे आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत प्रभागासंघ स्तरावर प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य सिंधुताई आलदर, पं.स.सदस्य सुवर्णा नवले, स्मिता गोडसे, ग्रामसंग वाकी अध्यक्ष स्नेहल गुजले, कोषाध्यक्ष सखुबाई माने, सदस्य सरस्वती पलसे, जनाबाई गौतसूर्य उपस्थित होत्या.
यावेळी कृषी व्यवस्थापक सोनाली घाडगे, स्वाती तारे यांनी आर्थिक साक्षरता याचे महत्त्व सांगितले. बापुसाहेब ठोकळे यांनी संविधान विषयी मार्गदर्शन केले. सुरज माने यांनी आर्थिक साक्षरता विषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रभाग समन्वयक अभिजीत महादेवकर, तालुका अभियान व्यवस्थापक आण्णा आवताडे, सुधीर पिसे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहारा महिला व सत्यमेव महिला प्रभागसंघ एखतपूरचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.























