बार्शी – डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या N M M S परीक्षेत भालगाव शिक्षण प्रसारक मंडळ भालगाव संचलित विद्या विकास विद्यालयाचा विद्यार्थी कु. ओम बालाजी दराडे याने यश संपादन केले असून संस्थेचे अध्यक्ष अनिल पिराजी घुगे यांनी ओमचे अभिनंदन केले.
संस्थेच्या विद्यमान सचिव लता शिवदास सानप यांनी ओमच्या यशाबद्दल अभिनंदन केले .प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर कराड तसेच क्षत्रिय सर, केसरे सर, फुलचंद घुगे सर, पुष्पांजली सानप, लेखनीक संतराम ढवळे, शिपाई महंमद शेख यांनी ओमचे अभिनंदन केले. तसेच सर्वांनी पुढील शिक्षणासाठी, यशासाठी शुभेच्छा दिल्या.






















