अक्कलकोट – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या ५,६ मार्च रोजी मुंबई येथे शिक्षण परिषद व खुल्या अधिवेशन होणार आहे.या खुल्या अधिवेशन साठी सोलापूर जिल्ह्यातून सुमारे पाच हजार शिक्षकांना घेऊन जाण्याची नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष वीरभद्र यादवाड यांनी दिली आहे.
या अधिवेशनात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे आदींनी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या शिक्षण परिषदेत शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाने दि. ४,५,६ मार्च असे तीन दिवस विशेष रजा मंजूर केले आहे.
५ मार्च ला शिक्षण परिषदेत राज्यातील १०० प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेच सादरीकरण, नामवंत शैक्षणिक तज्ञाचे मार्गदर्शन होणार आहे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने प्रत्येक जिल्ह्यातील १ शाळा गुणवत्ता पूर्ण दर्जेदार शाळा बनवण्यासाठी दत्तक घेणार आहे.जिल्ह्यात सुमारे नऊ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्या पैकी आता पर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ५,६ मार्च रोजी होऊ घातलेल्या शिक्षण परिषदेत सहभाग घेण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे चार हजार शिक्षकानी ५०० रु. नोंदणी फी देऊन नाव नोंदवले आहेत. आणखीन साधारण एक हजार शिक्षक नाव नोंदणी करणार असल्याचे माहिती सरचिटणीस रामभाऊ यादव यांनी दिली आहे.जिल्ह्यातील शिक्षक विशेष रजेच्या नावाखाली सहली न करता शिक्षक संघाच्या बौध्दिक मेजवानीसाठी बहुसंख्येने हजर राहावेत असे आवाहन शिवाजी पाटील संतोष जाधव, रमेश खाडे, प्रदीप अवताडे, बनकर, आदी पदाधिकारी केले आहेत
शिक्षकांची प्रमुख मागणी
शिक्षकांना टीईटी परीक्षा रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द करून पुर्ण वेतनावर नेमणूक करावेत, शालेय ऑनलाईन कामे काढून टाकावेत, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य पुरवठा करावेत, आरटीई कलमानुसार ५ ते ८ वर्गाना विषयवार पदवीधर वेतनश्रेणी शिक्षक नेमावे, पर्यवेक्षक पदे (केंद्रप्रमुख) अनुभवी शिक्षकातून १०० टक्के पदोन्नतीने द्यावी, १२१ पट संखेच्या शाळेला प्रशासनासाठी स्वतंत्रपणे मुख्याध्यापक नेमावे, जिल्हा परिषद सेसफंडातून प्राथमिक शाळाचे विद्युत बील, सपाई कामगार मानधन देण्याची तरतूद करावीत आदी मागण्या वर चर्चा होणार आहे
_ वीरभद्र यादवाड जिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सोलापूर


















