सोलापूर – मोची समाजाच्या कन्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सोलापूर शहरात मोची समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.
गरीब कुटुंबातून पुढे येत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेपर्यंत मजल मारल्याने मोची समाजाला संसदेत प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ही निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची विजय असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या निवडीबद्दल समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, यलप्पा तुपदोळकर, सन्नी म्हेत्रे, रवि नायक म्हेत्रे, अविनाश महाराज, नरसिंग वल्लापोलु, भिमा आसादे , ईश्वर म्हैत्रे, अंबादास माढेकर, अजय दिड्डी, भगवान करगुळे, जितेश मासे आदि मोची समाजातील युवक उपस्थित होते.























