अक्कलकोट – श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन आपण जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. या निमीत्ताने लाभलेले श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद मोलाचे असल्याचे मनोगत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व तुळजापूरचे नगरसेवक विशाल रोचकरी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, समर्थ स्वामी, तुषार मोरे, धनराज स्वामी आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व तुळजापूरचे नगरसेवक विशाल रोचकरी यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, प्रा. शिवशरण अचलेर व अन्य दिसत आहेत.






















