सोलापूर – सोलापूर तरुण भारत चे माजी संपादक ज्योतिषाचार्य नारायणराव कारंजकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, महापालिकेचे स्वीकृत सदस्य रोहिणी तडवळकर, ज्ञानेश्वर म्याकल, सोलापूर जिल्हा सहकारी खरेदी विक्री ग्राहक भांडार च्या उपाध्यक्षपदी रमेश बसाटे व दशरथ वडतिले यांची बसवेश्वर शासकीय आयटीआय च्या व्यवस्थापन सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल दि. 14 मार्च रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजता द्वारकाधीश मंदिर, दावत चौक, शिवदारे कॉलेज शेजारी, जुळे सोलापूर येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी संपादक अरुण करमरकर, समूह संपादक दिलीपराव पेठे, माजी संपादक अरविंद जोशी यांच्या शुभहस्ते हा सत्कार सोहळा होणार आहे. तरी तरुण भारत च्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.

















