Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विठ्ठल मंदिर परिसरात तात्पुरत्या व्यवसायिकांची भाऊगर्दी, अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
March 16, 2026
in editor
0
विठ्ठल मंदिर परिसरात तात्पुरत्या व्यवसायिकांची भाऊगर्दी, अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भोवती असलेल्या कायमस्वरुपी दुकानदारांपेक्षा तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी, फेरीवाले, हातगाडीवाले यांची अतिक्रमणे मंदिर परिसरात वाढलेली दिसत आहेत. मात्र त्याकडे पालिका,महसूल तसेच पोलिस प्रशासनाचे पुर्ण दुर्लक्ष होत आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे सहाजिकच मंदिर परिसरातील सध्या अस्तित्वात असलेले आहे ते प्रशस्त रस्ते अरुंद किंवा छोटे पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी वारकरी भाविक तसेच शहरातील सुज्ञ नागरिकांतून होत आहे.


राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर प्रसिध्द आहे. दरवर्षी येथे चार प्रमुख यात्रा भरत असतात. या यात्रांच्या काळात लाखोंच्या संख्येने भाविकांची येथे मांदियाळी असते. ऐरव्ही देखील दररोज पन्नास ते साठ हजार भाविकांचा येथे राबता असतो. सलग सुट्यां लागून आल्या तर या मध्ये मोठी वाढ होत असते. त्यामुळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर नेहमी गजबजुन गेलेला असतो. भाविकांची गर्दी वाढली तर मंदिर परिसरातून सर्वसामान्यांना चालणे देखील जिकरीचे होते.


मंदिर परिसरातील रस्ते तसे बऱ्या पैकी प्रशस्त आहेत. मात्र पूर्वी मंदिर परिसरातील कायमस्वरुपी स्थानिक दुकानदार मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करीत होते. मात्र गेल्या दोन,तीन वर्षापासून काँरिडोरच्या भितीने स्थानिक नागरिकांची अतिक्रमणे कमी झालेली दिसत आहेत. मात्र तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांची, फेरीवाले, हातगाडीवाले यांच्या अतिक्रमणात कमालीची वाढ झालेली दिसत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील प्रशस्त असलेले रस्ते अरुंद भासत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपातील अतिक्रमणाला पायबंद करावा अशी मागणी वारकरी भाविक तसेच शहरातील सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.


————————
चैत्री वारी तसेच अधिक मासात गर्दी वाढणार
येत्या काही दिवसांवर चैत्र वारी आलेली आहे. त्या नंतर पुन्हा अधिक मास आहे. त्यामुळे इथुन पुढच्या काळात पंढरपूरातील गर्दी मध्ये सातत्याने वाढ होत राहणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील रस्ते भाविकांना चालण्यासाठी अपुरे पडणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने आत्ता पासूनच मंदिर परिसरातील कायमस्वरुपी दुकानदारांना तंबी देवून त्यांना एका ठराविक रेषेच्या बाहेर आपली दुकाने आणण्यापासून मज्जाव करावा. या बरोबरच मंदिर परिसरात तात्पुरते व्यवसाय करणारे जे विक्रेते आहेत त्यांचा देखील बंदोबस्त करावा, या शिवाय हातगाडी, फेरीवाले यांना देखील दुसरीकडे मोकळ्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी तरच मंदिर परिसर सुटसुटीत दिसेल. 


——————–
मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर
विठ्ठल मंदिर हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे मंदिराच्या सुरक्षेसाठी राज्याच्या गृहविभागाने कायमस्वरुपी खास पोलिस बंदोबस्त देवू केलेला आहे. मंदिरा बाहेर स्वतंत्र पोलिस चौकी देखील कार्यरत आहे. मात्र मंदिर परिसरातील फेरीवाले, हातगाडीवाले तात्पुरत्या स्वरुपातील व्यवसाय करणारे विक्रेते यांच्याकडे मंदिर परिसरात विक्री करण्यासाठी कोणताही परवाना नाही. त्यांची शासकीय दप्तरी कुठेही नोंद नाही. त्यामुळे येथील विठ्ठल मंदिराची सुरक्षा सध्यातरी रामभरोसेच दिसत आहे.


——————-
काँरिडोर प्रकल्प रेंगाळला
मंदिर परिसर प्रशस्त आणि मोकळा असावा यासाठी विठ्ठल मंदिर परिसरात शासनाकडून काँरिडोर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र गेल्या दोन,तीन वर्षापासून या प्रकल्पाची नुसतीच चर्चा होत आहे. त्यासाठी कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही. सध्या जशी मंदिर परिसरात तात्पुरत्या व्यवसायीकांची भाऊगर्दी आहे तशीच गर्दी काँरिडोर झाल्या नंतर देखील सुरुच राहिली तर काँरिडोर करुन तरी काय उपयोग होणार, मंदिर परिसर पुन्हा आरुंद, चालण्यासाठी अपुराच पडणार असा देखील सूर मंदिर परिसरातील संभाव्य बाधित नागरिकांकडून आळविला जात आहे.

Post Views: 37
Previous Post

विधानसभेत नगरपंचायतीच्या दयनिय अवस्थेचा आ. पाटलांकडून पंचनामा

Next Post

सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा

सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा

ताज्या बातम्या

गुंगी गुडिया वक्तव्यावर बोलल्या सौ फडणवीस #viral

August 7, 2026

जरांगे पाटलांबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री #viral

August 7, 2026

अमित शहांनी राहुल गांधीच्या परदेशी वाऱ्याची कुंडलीच मांडली #viral

August 7, 2026

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव

August 7, 2026

आ.देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश सोलापूरचा साडीचा पारंपारिक वस्त्रोद्योगात समावेश

August 7, 2026

राज्यभरात बाईक टॅक्सी विरोधात वाहतूक संघटनेचे निवेदन

August 7, 2026

विडी कामगाराचा जल्लोष किमान वेतन हक्क समितीच्या लढ्याला मिळाले यश

August 7, 2026
शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

August 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033047

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!