सोलापूर – नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को ऑप बँक्स अॅड केडीट सोसायटी लि, नवी दिल्ली व सोलापूर जिल्हा बँक्स असोसिएशन चे दि. १२, १३ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले. असोसिएशन चे अध्यक्ष मा.डॉ.श्री. अशोक सुरवसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मा.सौ.माला लाल, उपसरव्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाले की, रिझव्ह बँकेच्या व बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट च्या डायरेक्टिव्हज व नियमाचे उल्लंघन केल्यास नागरी बँकांना आर्थिक दंड ठोठावण्यात येतो त्याचा परिणाम बँकेच्या प्रतिमेवर होतो.
सिओल उके, मॅनेजर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी रिझर्व्ह बँक ही मुख्यतः ठेवीदारांचा पैसा कसा सुरक्षित राहिल यासाठी नियंत्रण ठेवते व बँकेच्या धोरणनुसार कामकाज व कार्यपध्दती तपासते असे मार्गदर्शन केले. मा. सीए. श्री.धनंजय गोखले आपल्या व्याख्यानात म्हणाले की, सहकार क्षेत्र हे सभासदांच्या हितासाठी असून बँकिंग कायदा व रिझर्व्ह बँक हे ठेवीदाराच्या हितासाठी कार्य करते.. बँकांनी कायदे कानून पाळणे महत्वाचे आहे.
पळवाटा शोधू नये. बँकिंग अॅक्ट ला चॅलेंज करता येत नाही. नॅफकब चे चिफ अॅडव्हायझर मा.श्री. सुभाष गुप्ता यांनी सहकार चळवळ मध्यम व कमी उत्पन्न असलेल्या समाजातील व्यक्तीचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी आहे. तसेच सहकारी संस्थामुळे शेती, छोटे मध्यम उद्योग, व्यापाराचा विकास होत आहे. शहर व ग्रामीण भागात अर्थ पुरवठयाने रोजगार मिळत असल्याने समाजाचा विस्तार होत आहे. सहकारातील कार्य करणा-या घटकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे जरुरीचे आहे असे सांगितले.
नॅफकब चे असिस्टंट डायरेक्टर मा.श्री. अनिल चौहान यांनी वक्त्यांचे परिचय करुन दिले, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्री. अशोक सुरवसे, उपाध्यक्ष श्री दिपक मुनोत, सर्व संचालक श्री. राजगोपाल झंवर, सीए श्री. राजगोपाल मिणियार, सीए श्री. किसन माळी, सौ. संगीता फाटे, सौ. अस्मिता गायकवाड, श्री. दिनकर देशमुख, संपादक श्री. राजेंद्र कोठावळे सह सोलापूर जिल्हयातील नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट संचालक, सीईओ, जनरल मॅनेजर, इ. उपस्थित होते. दि.१२ मार्च रोजीचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभार संचालक श्री. दिनकर देशमुख व दि.१३ मार्च रोजीचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभार संचालिका सौ. अस्मिता गायकवाड यांनी मानले.
सदर चर्चासत्राचे सुत्रसंचालन असोसिएशन ने मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.शुभांगी ढवळे व नॅफकब चे असिस्टंट डायरेक्टर मा.श्री. अनिल चौहान यांनी केले.






















