अकलूज – दिनांक 18 मार्च 2016 बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले दोन व मुली तीन अकलूज येथे प्रवेशोत्सवा अंतर्गत आज शैक्षणिक गुढी उभारण्यात आली.रांगोळी च्या पायघड्या, फुग्यांची सजावट, डोक्यावर मुकुट, सेल्फी पॉईंट, पहिल्याच दिवशी स्कूल बॅग, गुणवत्तेची गुढी, गोड खाऊ आणि हलगीच्या तालावर झालेले स्वागत. यामुळे मुले आणि पालक खूप आनंदी झाले. पालकांनी आपल्या मनोगतातून मराठी शाळेचे महत्त्व सांगितले. सर्व शिक्षकवृंदांच्या कल्पनेतून साकारलेला आजचा प्रवेशोत्सव अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाप्रसंगी मुले दोनच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले मॅडम, श्रीमती मनीषा बळवंतराव मॅडम, श्रीमती अंजली अडाणे मॅडम, श्री दत्तात्रय गायकवाड सर, श्री तय्यब शेख सर, श्री श्रीकांत राऊत सर,श्रीमती फातिमा मुलाणी मॅडम, श्रीमती हजराबी बांगी मॅडम तसेच मुली तीन शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कोरे सर, श्री महादेव नागणे सर ,श्रीमती रेखा कोळी मॅडम, श्रीमती सुरेय्या कोरबु, मॅडम श्री पांडुरंग मोहिते सर, श्री समीर कोरबू सर ,श्रीमती वर्षा राणी जाधव मॅडम, करीना शेख मॅडम व शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालक उपस्थित होते.























