सांगोला – लोकमंगल बँक शाखा सांगोलाचे सल्लागार सीए उत्तम बनकर यांचे चिरंजीव उत्कर्ष बनकर हे नुकतेच सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल बँकेचे संचालक विजय कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाखा सल्लागार अमोल खरात, ऍड.गजानन भाकरे, गिरीश नष्टे, सीए उत्तम बनकर, उद्योगपती रामहरी लेंडवे, योगेश ज्ञानमोटे, व्यवस्थापक शिवाजी दरेकर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत ज्योती गुळमिरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास वालीकर, अजय महामुनी, विजय स्वामी यांनी परिश्रम घेतले.





















